बेळगाव : जायंट्सच्या कर्नाटक शाखा द्वारा फेडरेशन 6 ची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स येत्या रविवारी महिला विद्यालय, मराठी माध्यम शाळेच्या सभागृहात संपन्न होणार आहे. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परिषदेत कर्नाटकातील विविध ग्रुपचे 150 सभासद सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन …
Read More »इंडियन बँकेच्या लॉकरमधील चोरी प्रकरणी एक अटकेत; 14 लाखाचे दागिने जप्त
बेळगाव : शहरातील भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील इंडियन बँक शाखेच्या लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आले असून त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडील 14 लाख रुपये किमतीचे एकूण 143.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव चंद्रकांत बालाजी …
Read More »कारच्या धडकेत १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
अथणी : अथणी – जमखंडी मार्गावर तनिष्का बारजवळ झालेल्या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या मुलाला एका भरधाव कारने चिरडले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अगस्त्य कानमाडी (वय १०) रुद्देरट्टी (ता. अथणी) असे मुलाचे नाव आहे. अथणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चालक …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रोटरीचे प्रांतपाल अशोक नाईक यांचा सत्कार
येळ्ळूर : उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदी, बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ व श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात नूतन …
Read More »तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांच्याशी रमाकांत कोंडूसकर यांनी केली सीमाप्रश्नासंदर्भात चर्चा
बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय खासदार श्री. धैर्यशील माने यांची म. एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी आज दि. 4 जुलै रोजी कोल्हापूर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोंडूसकर यांनी माने यांचा सत्कार केला. व सीमाप्रश्नी चर्चा केली. ह्या भेटीदरम्यान येणाऱ्या …
Read More »राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले!
बेळगाव : सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बेळगाव शहराची तहान भागवणारे राकसकोप जलाशय देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे एक दार उघडण्यात आले आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बेळगाव शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याची …
Read More »भाषिक अल्पसंख्याक आयोगासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्तीची दखल घ्यावी : प्रकाश मरगाळे
बेळगाव : कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी एक अध्यादेश जारी केला असून शासकीय कार्यालयात फक्त कानडी भाषेचा वापर करावा असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या त्रिसूत्रीय धोरणाला वाटाण्याच्या अक्षताच म्हणाव्या लागतील. कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्या आदेशाची बेळगाव महानगरपालिकेने …
Read More »सीमाप्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती!
मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी 7 जणांची तज्ञ समिती जाहीर केली आहे. तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर खासदार धनंजय महाडिक यांची सहअध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या समितीत एकूण 7 जण आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून …
Read More »कोल्हापूर सर्कलजवळील जीर्ण इमारतीत आढळला संशयास्पद मृतदेह
बेळगाव : बेळगाव शहराच्या कोल्हापूर सर्कलजवळील एका जीर्ण इमारतीत गुरुवारी एका भिक्षुकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदर भिक्षुकाचा मृत्यू गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. उत्तरीय तपासणी आणि पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात …
Read More »इंगळी येथील गोरक्षकांवरील हल्ल्याचा निषेधार्थ श्रीराम सेनेकडून निदर्शने
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांना झाडाला बांधून केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज श्रीराम सेनेने ‘इंगळी चलो’ आंदोलनाचे आयोजन केले होते. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर इंगळी गावाकडे निघालेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगावात हजारोच्या संख्येने श्रीराम सेनेचे कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते. त्यांनी एक भव्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta