Sunday , March 8 2026
Breaking News

बेळगाव

पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा स्पोर्ट्स क्लबला जनरल चॅम्पियन

  बेळगाव : गोवावेस कॉर्पोरेशन जलतरण तलावात आबा हिंद स्पोर्ट्स व क्रीडा भारती यांच्यावतीने घेतण्यात आलेल्या दुसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 929 गुण वसूल करून जनरल चॅम्पियनशिप मिळविली तर स्वीमर्स क्लब 612 गुण घेऊन द्वितीय स्थानावरती राहिला. दुसऱ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या जलतरण स्पर्धेत 15 …

Read More »

मोहनगा यात्रा 13 फेब्रुवारीपासून; यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी

  दड्डी : मोदगे तालुका हुक्केरी गावची भावेश्वरी श्री देवीची यात्रा गुरुवार 13 फेब्रुवारी पासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. यात्रा उत्सव कमिटी मोदगे. ग्रामपंचायत सलामवाडी वतीने यात्रेची तयारी सुरू केली आहे. यात्रेचे कार्यक्रम….. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी शस्त्रइंगळ्या. सायंकाळ 6 ते शुक्रवार सकाळ 6 पर्यंत सुरू राहील. शुक्रवार …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील मादी सिंहाचा मृत्यू झाला आहे. निरुपमा नावाच्या 15 वर्षीय मादी सिंहाचा आज दुपारी 12:55 वाजता वृद्धापकाळ आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निरुपमा सिंहावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. नंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने …

Read More »

रोटरी वेणुग्रामच्यावतीने 16 फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : उत्तर कर्नाटकात प्रथमच (42. 195) किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध राज्यातील चार हजाराहून अधिक धावपटू भाग घेणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना बाळीकाई म्हणाले, उत्तर कर्नाटकात प्रथमच 42.195 …

Read More »

श्री सरस्वती वाचनालयाच्यावतीने रविवारी स्वरांजली भावगीत मैफल

  बेळगाव : श्री सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच विभागातर्फे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांचा बहारदार मराठी भावगीतांचा “स्वरांजली” सुगमसंगीत कार्यक्रम रविवार दि. 9 रोजी सायंकाळी 5.30 वा. वाचनालयाच्या श्रीमती माई ठाकूर सभागृहात होणार आहे. त्यांना सिंथेसायझरवर सुनील गुरव (कोल्हापूर), ऑक्टो पॅडवर स्नेहल …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे ‘गोष्टरंग’ चे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, राज्य मराठी विकास संस्था मुंबई व मराठी विद्यानिकेतन शाळेच्या संयुक्त विद्यमाने सीमा भागातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘गोष्टरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोष्टींचा आनंद लुटता यावा यासाठी या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर यादरम्यान मराठी विद्यानिकेतन …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या काळजीकेंद्रात वास्तव्यास असलेल्या रुग्णांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. आज सकाळी प्रीती राजू चौगुले यांच्याहस्ते फीत कापून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, संचालिका रेखा बामणे, सल्लागार सदस्या विद्या सरनोबत आदी उपस्थित होत्या. यानंतर …

Read More »

अनगोळ येथे रविवारी भव्य जंगी शर्यत…

  बेळगाव : अनगोळ श्री कलमेश्वर बैलगाडा युवा शर्यत कमिटीच्यावतीने शनिवार दि. 8 व रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी खाली बैलगाडी ओढण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सदर शर्यतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी कलमेश्वर बैलगाडा युवा शर्यत कमिटीच्यावतीने भव्य बक्षिसे जाहीर करण्यात आली …

Read More »

बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन बळकावली

  बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील बाची गावात घडली. 2003 मध्ये विजय आसगावकर यांचे निधन झाले, त्यांच्या आई कमलाबाई आसगावकर 2001 …

Read More »

दुचाकी दुभाजकाला आदळून अपघात; सुळेभावी येथील युवक ठार

  बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकास आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवक ठार तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुने बेळगाव नाक्याजवळ बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव मंजुनाथ होसकोटी वय 25 रा. सुळेभावी असे असून निंगाप्पा …

Read More »