Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी “श्री दुर्गामाता दौड”ला जल्लोषात सुरुवात

  बेळगाव : आज देशभरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती. आज पहिल्या दिवशी देव, देश आणि धर्माच्या रक्षणाची जनजागृती करून श्री दुर्गामाता दौड यशस्वीरीत्या संपन्न झाली. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात १० दिवस देवीचा जागर केला जातो. याचदरम्यान श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. …

Read More »

सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे एल.के.जी., यु.के.जी. वर्गाचे उद्घाटन

  बेळगाव : आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे शासनाच्या आदेशानुसार एल.के.जी. आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या आणि लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि गांधीजींचे भजन गाऊन करण्यात आली. त्यानंतर एल.के.जी. वर्ग खोलीचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे वीर सौधमध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वरांजली भजन कार्यक्रम

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, वार्ता विभाग तसेच बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सौध येथे आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात संगीत शिक्षक विनायक मोरे, अक्षता मोरे आणि सहकारी यांच्या स्वरांजली भजन संगीताने कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांनी वैष्णव …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या मुलींच्या खो-खो संघाला जिल्हापातळीवर विजेतेपद

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आंबेवाडी बेळगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या मुलींच्या संघाचा सहभाग होता. पहिल्या फेरीत सौंदत्ती विरुद्ध सामन्यात एकतर्फी विजय मिळवला त्यानंतर उपांत्य फेरीत खानापूर विरुद्ध 10-6 अशा गुणांनी विजय पटकावत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामना …

Read More »

दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक; ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी जप्त

  अथणी : अथणी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून ७ लाख ७५ हजार रू. किंमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमूल जितेंद्र पवार (रा. सिंधुर ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र), लखन सुंगारे (रा. मदबावी, ता. अथणी, जि. …

Read More »

म. गांधी विचार गौरव पुरस्काराने कॉ. कृष्णा मेणसे सन्मानीत

  दिमाखदार सोहळ्यात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : गांधी विचार व कम्युनिस्ट विचार हे दोन टोकाचे विचारप्रवाह आहेत. असे असताना कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ही माझ्या दृष्टीने वेगळी घटना आहे, असे उद्‌गार कॉ. संपत देसाई यांनी पुरस्कार …

Read More »

सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू; खासदार शाहू महाराजांचे समिती शिष्टमंडळाला आश्वासन

  बेळगाव : कर्नाटकाच्या जोखंडात असलेला मराठी सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना बुधवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. ज्योती महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार शाहू महाराज आले असताना त्यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने …

Read More »

वकील रमेश चौगुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश

  बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावचे रहिवासी, प्रतिष्ठित नागरीक वकील श्री. रमेश चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात बेळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री. जोतिबा चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. सहकारी मित्र संदीप अष्टेकर, जोतिबा कणबरकर, यल्लाप्पा भोगुलकर यांनी ही प्रवेश केला. सदर प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

आनंदी जीवन जगण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण पिढीतील समन्वय गरजेचा : प्रा. युवराज पाटील

  संजीवीनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन बेळगाव : जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ज्येष्ठांनी तरुण पिढीला समजून घेऊन आणि तरुण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत समन्वय साधत वाटचाल केली पाहिजे तरच दुःखाला सामोरे न जाता आनंदाने जगता येईल. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे माणसाला दुःखाचा सामना करावा लागतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या वतीने खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन

  बेळगाव : भाषावार प्रांतरचनेपासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगावसह सीमावासीय आजपर्यंत लढत आहेत. 67 वर्षे झाली आम्ही अजून ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण हल्ली महाराष्ट्र मात्र सीमाप्रश्नावर उदासीन दिसतोय, सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच न्यायालयात आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळणं काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांची फी सुद्धा पोहोचली नाही यावरून …

Read More »