Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

बेळगावात ब्लॅक कमांडोंचे पथसंचलन

बेळगाव : मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर सरकारने बेळगाव शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि ब्लॅक कमांडोचे पथसंचलन काढण्यात आले. गणेश चतुर्थीचा एक भाग म्हणून शहरातील विविध वसाहती आणि गल्लीत स्थापन करण्यात आलेल्या सुमारे ३७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन १७ सप्टेंबर रोजी होणार …

Read More »

मार्कंडेय नदीचे पावित्र्य राखण्याचे आवाहन

  बेळगाव : कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये व नदीच्या परिसरात केरकचरा तसेच गणेशोत्सव काळात पूजेचे साहित्य व गणेश विसर्जन दिवशी नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पूजेचे साहित्य (हार, केळीची झाडे, डेकोरेशनचे साहित्य) नदीत न टाकता तिथं उभा असलेल्या गाडीत किंवा ट्रॉलीत टाकून सहकार्य करावे. अन्यथा कडक …

Read More »

डॉ. शरणप्पा यांनी पटकाविला पीजी- नीट परीक्षेत देशात 9वा क्रमांक

  बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स)चे वैद्यकीय विद्यार्थी डॉ. शरणप्पा यांनी राज्यस्तरीय पी.जी. नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. बिम्सचे एमबीबीएसचे विद्यार्थी असलेले डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बिम्स संस्था वैद्यकीय …

Read More »

रविवारी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी मानवी साखळीचे आयोजन

  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचे महत्त्व जगाला कळावे यासाठी, कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले आहे. मानवी साखळी …

Read More »

२० कोटींच्या नुकसानभरपाई प्रकरणाला नवे वळण!

  बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणामुळे जमीन गमावलेल्या जमीन मालकांना २० कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. महापालिकेने जमीन परत देण्याचे मान्य केले आणि जमीन मालकानेही जमीन परत घेण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. स्मार्ट सिटी रोडच्या बांधकामामुळे महापालिकेला अडचणी येत होत्या आणि या प्रकरणाने धारवाड उच्च …

Read More »

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!

  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 15-09-2024 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव शंकरराव देसाई यांनी …

Read More »

पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन उत्साहात

  बेळगाव : पाचव्या दिवशीच्या घरगुती गणेशमूर्तीचे आज बुधवारी विसर्जन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. त्यामुळे महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. शहरात यंदा शनिवारी ७ रोजी गणेशमूर्तीचे उत्साहात आगमन झाले होते. त्यानंतर काही जणांनी दीड दिवसाच्या गणपतीला निरोप दिला होता. मंगळागौर झाल्यानंतर पाचव्या दिवशी घरगुती विसर्जन करण्याची …

Read More »

श्री गणेश २०२४ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता प्रताप कालकुंद्रीकर; बेस्ट पोझर मोरेश देसाई

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयच्या सभागृहात २० व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रताप कालकुंद्रीकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मराठी विद्यानिकेतन मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्राथमिक विभाग मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात महांतेश नगर शाळेचा एकतर्फी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात 14 नंबर शाळेचा सलग दुसऱ्यांदा पराभव करत तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले. …

Read More »

विद्याभारती राज्य अथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश

  बेळगाव : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तीन रौप्य एक कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकर हिने लांब उडी व तिहेरी उडीत दोन सुवर्णपदक, समीक्षा …

Read More »