Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

दहावीच्या वार्षिक परीक्षेला विलंब होण्याची शक्यता

बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्‍या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत …

Read More »

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

  बेळगाव : घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शहरातील एक माता आपल्या मुलाला जीवदान मिळावे यासाठी झटत आहे. त्यासाठी एक नव्हे तर दोन -दोन कामे करून राबत आहे. तिच्या मुलावर मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. तानाजी गल्ली, होनगा येथील 32 वर्षीय …

Read More »

घर फोडून २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

बेळगाव : बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यानी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. पहिला मुख्य दुसरा क्रॉस सदाशिवनगर विजय बेकरीनजिक मंगळवार (ता.१६) सकाळी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अनुजा बसवराज धबाडी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी बैठक

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट) आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात …

Read More »

एमडी अंमली पदार्थाचे चंदगड तालूक्यात धागेदोरे, एकाला अटक

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्या देशभर गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणातील हाय प्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी आल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात ढोलगरवाडीतून एकाला अटक करून पोलिसांची टिम मुंबईला रवाना झाली आहे. …

Read More »

परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ उद्या

बेळगाव : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीसाठी खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयात परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी होणार असून भक्तांनी ३.३०च्या आत हजर रहावे, बरोबर ३. ४५ वाजता आरती …

Read More »

मच्छे भागातील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

बेळगाव : मच्छे भागात अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांनी आज सकाळी रास्तारोको केला. खानापूरहूनन निघालेल्या बसेस या फुल असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. परिणामी या भागातील विद्यार्थ्यांना तासंतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी मच्छे नेहरूनगर येथे रास्ता रोको करून बसचा …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले. या आश्रमामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थिनी शिक्षणाकरिता परगावाहून या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता आले आहेत. या विद्यार्थिनींचा दिवाळी सण द्विगुणीत करण्याकरिता माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडून नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. या गणवेश करिता मोलाचे सहकार्य केलेले खडेबाजार बेळगाव येथील …

Read More »

स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना मिळतो वाव : लक्ष्मण पवार

गणेश महोत्सव 2021 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात बेळगाव : स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळतो. यासाठी विविध संघ-संस्थांच्यावतीने आयोजित स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांनी आपल्या अंगभूत कलेला वाव द्यावा असे कर्नाटक राज्य सौहार्द सरकारी फेडरेशनचे संचालक लक्ष्मण पवार म्हणाले. विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण …

Read More »

सांबरा येथे दोघा सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : भाऊबीजेनंतरचा दिवस हा बहिणतीज म्हणून ओळखला जातो. बहिणींच्या दृष्टीने विशेष आनंदाचा असणारा हा सण सांबरा येथील दोघा बहिणींसाठी कर्दनकाळ ठरला. तलावात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी महादेव तलाव येथे घडली. त्यामुळे सांबरा परिसरावर शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून घरामध्ये झालेल्या पूजेचे …

Read More »