बेळगाव : शहरातील प्रजापिता ईश्वरी विद्यापीठाच्या वतीने महाशिवरात्रीचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘शिव संदेश’ शांती सद्भावना यात्रा काढण्यात आली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बेळगाव शाखाप्रमुख अंबिका दीदी यांनी गुरुवारी शहरातील महांतेश नगर येथील प्रजापीता ईश्वरीय विद्यापीठात शांती सद्भावना वाहन चालवले. यावेळी बोलताना दादी अंबिका म्हणाल्या, हिंदू जीवनशैली आणि …
Read More »जुना पी. बी. रोडवर आढळला अनोळखी मृतदेह
बेळगाव : जुना पी. बी. रोड येथील एका दर्ग्याजवळ अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे मृत व्यक्तीचे वय 60 ते 65 आहे. शहापुर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्या वृद्धाचा मृत्यू आजारपणाने किंवा अशक्तपणाने झाला असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती 5 फूट 4 इंच, …
Read More »महाशिवरात्री निमित्त उद्यापासून दक्षिणकाशीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : येथील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारपासून रात्री 12 नंतर पंचामृत अभिषेकाला सुरुवात होणार आहे. श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने पहिला अभिषेक समस्त बेळगावकर नागरिकांच्या साठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक सुरू राहणार आहे. त्यानंतर रुद्राभिषेक …
Read More »येळ्ळूरमध्ये ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार (ता. 20) फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8-00 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील संमेलन स्थळी राधानगरी येथील ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा भव्य दिव्य असा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास दर्शविणारा हा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. …
Read More »निवडणूक प्रचाराच्या साहित्याचे दर निश्चित करणार : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्याचे दर निश्चित करून ते निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत. आचारसंहिता लागू असताना या दरांच्या आधारे प्रचाराचा खर्च काढला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक-2023 च्या प्रचार साहित्याच्या किंमतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व …
Read More »येळ्ळूरमध्ये रविवारी 18 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण संमेलन तयारी पूर्णत्वाकडे येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी पूर्णत्वाकडे …
Read More »शनी प्रदोष दि. १८ फेब्रुवारी रोजी
बेळगाव : शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी शनी प्रदोष आणि महाशिवरात्र असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या निमित्ताने पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात शनी होम, शनी शांती, तैलाभिषेक, रुद्राभिषेक आदि सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. शनी प्रदोष निमित्त सायंकाळी सहा वाजता विशेष अभिषेक करण्यात येणार …
Read More »मद्यपींच्या शेतातील वावराने शेतकऱ्यांतून नाराजी
बेळगाव : शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे या शिवारात तसेच या भागात असलेल्या रस्त्याच्या कडेला रात्री 8 ते 11 पर्यंत दारु, गांजा, सिगारेट, जुगार, वाढदिवस व पार्ट्या करणारे शेतात बसून आपले कार्यक्रम करत असतात. त्यात लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून शेतातील गवत गंजीच्या आडोशाला बसून दारुच्या काचेच्या, प्लास्टिकच्या …
Read More »शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर महापौरांना दुय्यम स्थान!
उपमहापौर रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रणपत्रिकेत नाही बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे रविवारी (ता. 19) आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर शहराच्या नूतन महापौर शोभा सोमणाचे यांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. तर उपमहापौर रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रणपत्रिकेत नाही. 19 फेब्रुवारी रोजी प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. …
Read More »शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात चोरीचा प्रयत्न, तक्रार दाखल
बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात खिडकीचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान खिडकीचा लोखंडी दरवाजा, गंगाळ आणि इन्व्हर्टर मात्र लांबविण्यात आले आहे. याप्रकरणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मंगळवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta