Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

हेस्कॉम विरोधातील धरणे आंदोलन लांबणीवर

  बेळगाव : सिंगल फेज वीजपुरवठ्याबाबत शुक्रवारी (ता. १०) आयोजित धरणे आंदोलन लांबणीवर टाकण्यात आले आहे. मच्छे विभागातील संतिबस्तवाड, वाघवडे, झाडशहापूर, मच्छे, बाळगमट्टी, पिरनवाडी, किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले शिवारात रात्रीच्यावेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळेच शुक्रवारी …

Read More »

महानगरपालिकेमध्ये पुन्हा मराठी भाषेला छेद!

  बेळगाव : बेळगाव प्रशासनाला नेहमीच मराठी भाषेचा त्रास होत असतो. तर दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या की लोकप्रतिनिधींना मराठीची जाग येते. याचा अनुभव अनेक वेळा बेळगावकरांना आलेला आहे. महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेमधील महापौर- उपमहापौर कक्षा बाहेर असलेल्या फलकावरून जाणीवपूर्वक मराठीला वगळल्याचे निदर्शनात आले आहे. …

Read More »

येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने आयोजित कथाकथन स्पर्धेत समृद्धी पाटील व अनुजा लोहार प्रथम

    येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कै. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे यांच्या स्मरणार्थ आयोजित कथाकथन स्पर्धेत कुमारी समृद्धी गणपती पाटील व कुमारी अनुजा दत्तात्रय लोहार यांनी प्रथम क्रमांक मिळविले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शुक्रवार (ता 10) रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात सदर कथाकथन स्पर्धा घेण्यात …

Read More »

रखडलेल्या गटार कामांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकासकामे सुरू आहेत.विकास कामांना चालना मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना नव्या त्रासाला तोंड देण्याची वेळ आली आहे. असा प्रकार राम कॉलनी आदर्श नगर परिसरातील गटार बांधणी कामात …

Read More »

छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन करूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करा : रमाकांत कोंडूस्करांचा इशारा

बेळगाव : जनतेचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. कोणताही कार्यक्रम असो महाराजांना वंदन करूनच कार्यक्रमाला सुरू होते. परंतु बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येथे लावण्यात आलेली नाही. महाराजांची मुर्ती बसवूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. संपूर्ण बेळगावकरांच्या …

Read More »

कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन

  बेळगाव : महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्श नगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. 9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. …

Read More »

बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा पूर्ववत करावी

  दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला निवेदन सादर बेळगाव : बेळगावमधील वारकर्‍यांसाठी बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवा प्रत्येक दिवशी दोन वेळा पुन्हा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी दत्तक योजनेला शिवाजी हंगिरकर व सोनाली माने कोंडुसकर यांच्याकडून आर्थिक मदत

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक योजनेला समाजातील दानशूर व्यक्ती, शाळेचे हितचिंतक व माजी विद्यार्थी भरभरून मदत करीत असतात.. या योजनेच्या माध्यमातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळेकडून दिले जाते… तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे व चांगले शिक्षण व शैक्षणिक सुविधा …

Read More »

चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल जनतेतून संतप्त प्रतिक्रिया

    बेळगाव : किरण जाधव यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा दि. 5 रोजी अचानकपणे रद्द झाल्यामुळे सर्व थरातून अजूनही निषेध व्यक्त केला जात असल्याचे समोर आले आहे. किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती. परंतु स्पर्धे दिवशी सकाळी अचानकपणे …

Read More »

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने 67 हुतात्म्यांना अभिवादन

  बेळगाव : 1969 मध्ये मुंबई येथे झालेल्या सीमा आंदोलनात बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज बुधवारी सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा प्रमुख शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन …

Read More »