Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या

  बेळगाव : येथील हिंडलगा कारागृहात पोक्सो कायद्यान्वये खटला सुरू असलेल्या कैद्याने रविवारी आत्महत्या केली. कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावातील मंजुनाथ नायकर (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध कित्तूर पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येचे नेमके कारण …

Read More »

येळ्ळूरसाठी आजपासून दोन नवीन बसेस धावणार

  बेळगाव : आजपासून नवीन दोन बसेसचे उद्घाटन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले व नागरिकांना दोन्ही बसेस चालू करण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, के एस आर टी सी विभागीय अधिकारी श्री. पी. वाय. नाईक डेपो मॅनेजर विजय कुमार होसमनी, बसवराज मादेगौडा, ग्राम …

Read More »

मुरगोडजवळ घर कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू

बेळगाव : मुसळधार पावसामुळे महादेव लक्षमप्पा बागिलद यांचे घर कोसळून बालक प्रज्वल (५) आणि आई यल्लवा महादेव बागिलद (४०) यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यरगट्टीजवळील माडमगेरी गावात घडली. घटनास्थळी तहसीलदार महांतेश मठद, सीपीआय मौनेश्वर मालीपाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली, एएसआय वाय. एम. कटगोळ तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली …

Read More »

येळ्ळूरच्या शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूची राज्य स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर येथील विश्वभारत सेवा समिती संचालित श्री शिवाजी हायस्कूलचा खेळाडू दैवदीप देवानंद धामणेकर याने बेळगाव येथील क्रीडांगणावर शिक्षण खात्याच्या वतीने नुकताच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक संतोष मेलगे, मुख्याध्यापक मनोहर बाचीकर व सहशिक्षकांचे …

Read More »

येळ्ळूर गावात गतिरोधक बसविण्याची मागणी

  येळ्ळूर ग्राम पंचायतच व येळ्ळूरमधील सर्व शाळांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, येळ्ळूर हद्दीत येणार्‍या सर्व शाळांजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदिहळ्ळी, देसुर …

Read More »

टीम ढोलियातर्फे 8 ऑगस्ट रोजी रस रसिया-22 कार्यक्रम

  बेळगाव : बेळगावच्या टीम ढोलियातर्फे 8 ऑक्टोबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात रस रसिया-22 गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रस रसिया कार्यक्रमाच्या समन्वयक ट्विंकल गांधी यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमा रुपाला यांच्या प्रेरणेने व बेळगाव जिल्हा भाजप …

Read More »

…म्हणे म. ए. समितीवर बंदी घाला : कन्नड पुंडांनी पुन्हा गरळ ओकली!

बेळगाव : बेळगावात १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन जवळ येताच पावसाळी अळंब्यांप्रमाणे कन्नड संघटनांना पेव फुटते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कन्नड भाषा आणि संस्कृतीचे रक्षक असल्याचा आव आणून धड मिसरूडही न फुटलेली पोरंटोरं बेताल वक्तव्य करतात. अशाचप्रकारे पीएफआयप्रमाणे म. ए. समितीवर बंदी घाला अशी मागणी कानडी पुंडानी गरळ ओकली. पीएफआय संघटनेवर ज्याप्रमाणे …

Read More »

राज्यस्तरीय दसरा रोलर स्केटिंगमध्ये आर्या कदम आणि व आराध्या पी. यांचे सुयश

बेळगाव : शिमोगा महानगरपालिका आणि कर्नाटक रोलर स्केटिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलामुलींच्या राज्यस्तरीय खुल्या दसरा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटुनी अभिनंदन यश मिळविले आहे. शिमोगा येथे गेल्या 27 सप्टेंबर रोजी मुला मुलींच्या राज्यस्तरीय खुल्या दसरा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत …

Read More »

…चक्क आजी सहीसाठी आयसीयूतून उपनिबंधक कार्यालयात

  उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा माणुसकीशून्य कारभार बेळगाव : बेळगाव सब रजिस्ट्रार, कर्मचाऱ्यांचा माणुसकीला काळिमा जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसाठी चक्क आयसीयूतून कार्यालयात बोलावून बेळगाव उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या घटनेत सब …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कित्तूर किल्ल्याची पाहणी

  बेळगाव : शुक्रवारी कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कित्तूर संस्थानाच्या राजवाड्याबद्दल माहिती फलक तयार करावेत जेणेकरून पर्यटकांना किल्ला आणि राजवाड्याची माहिती मिळण्यास मदत होईल, यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती फलक लावण्याबाबत योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »