Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

जिथे संस्कार तिथे संस्कृती : आपटे

गणेशपूर संत मीरा शाळेत गुरुपौर्णिमा साजरी बेळगाव : जिथे संस्कार असतात, तिथे संस्कृती नांदत असते. प्रगती होत असते. जिथे विकृती असते तेथे अधोगती असते. जीवनात अनेक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरु भेटत असतात. आपले आईवडील पहिले गुरु असतात, असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांनी व्यक्त केले. गणेशपूर येथील संत मीरा …

Read More »

रयत गल्लीतील घराची भिंत कोसळली

बेळगाव : मुसळधार पावसाने रयत गल्ली मा.वडगाव येथील विधवा महिला निता विवेक डोंगरे यांच्या घरची भिंत रविवारी दुपारी कोसळल्याने घराचे छप्पर जमीनीवर पडले आहे. सुदैवाने त्या व त्यांची मुलं घरात नसतानां ही घटना घडल्याने अनर्थ टळला. या कुटुंबाला मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे

Read More »

शाहुनगरात डेंग्यू व चिकुनगुनिया लसीकरण शिबीर

  बेळगाव : शाहुनगर, बेळगाव येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांच्यावतीने मोफत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. पाटील बिल्डिंग, शिवबसव मार्ग, शाहुनगर, बेळगाव येथे आज, रविवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांतर्फे मोफत डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण …

Read More »

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या वतीने बेळगावातील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी आणि पुस्तक संग्राहक शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रामदेव गल्ली, बेळगाव येथील गिरीश कॉम्प्लेक्शच्या शहीद भगतसिंग सभागृहात रविवार दि. १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार …

Read More »

मार्कंडेय नदी ओव्हरफ्लो!

  बेळगाव : पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे …

Read More »

आगामी निवडणुकीत विकासकामेच ठरणार काँग्रेससाठी वरदान : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

कुडची : मागील काळात काँग्रेस सरकारने सुशासन देण्याबरोबरच अनेक विकासकामे केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही विकासकामे वरदान ठरणार आहेत, असे मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कुडची विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व पक्ष संघटनेच्या हितासाठी 6 दिवस आयोजित भव्य सायकल जथ्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे …

Read More »

अन्नपुर्णेश्वरी नगर येथे पावसाच्या पाण्यामुळे बेघर!

  बेळगाव : बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. वडगाव परिसरात देखील अनेक ठिकाणी पाणी घरात शिरून बरेच नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती वडगाव अन्नपुर्णेश्वरी नगर 6 क्रॉस येथे सुद्धा विष्णू दत्ताराम दरेकर यांची झाली आहे. घरातील छप्पर गळत असून घरचा परिसर पाण्याने …

Read More »

ओमनगरमध्ये पावसाच्या पाण्याने रहिवाशी चिंतेत

  बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. …

Read More »

बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

  बेळगाव : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या स्वच्छ विद्यालय अभियानात सहभागी झालेल्या बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली होती. त्यात बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलचाही सहभाग होता. शिंदोळी …

Read More »

कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर

  बेळगाव : महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील कोकण भागात वरुणराजाने कहर केला आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्या, वेदगंगा व दूधगंगा नद्यांना पूर आला होता. परंतु कालपासून महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी …

Read More »