Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

हिडकल जलाशयातून घटप्रभावरील कालव्याला पाणी पुरवठा करण्याची मागणी

बेळगाव : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत चालली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि जनावरांना बसत असून गोकाक आणि मूडलागी परिसरातील शेतकरी या समस्येमुळे अडचणीत आहेत. हिडकल जलाशयातून घटप्रभा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. मानुष्यासह …

Read More »

बेळगावमध्ये विनाअनुदानित शाळा-महाविद्यालय कर्मचारी-शिक्षकांचे आंदोलन

बेळगाव : १९९५ नंतर प्रारंभ झालेल्या विना अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाच्या वतीने शाळा-महाविद्यालयांना अनुदान मिळावे तसेच कर्मचारी वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगाव शहरात राज्यस्तरीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले. १९९५ नंतर स्थापन झालेल्या शाळा महाविद्यालयातील प्रशासकीय मंडळाला तसेच कर्मचाऱ्यांना अनुदान आणि वेतन देण्याच्या मागणीसाठी आज बेळगावमध्ये आंदोलन हाती …

Read More »

बेळगावच्या महिला ॲथलेटची सुवर्णपदकाची कमाई

बेळगाव : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी का अमृत महोत्सव यांच्यावतीने खेलो इंडिया मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेचे बेळगावच्या महिला ॲथलेटने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगावच्या कन्येने गरुड झेप घेत तीन …

Read More »

रांगोळीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

बेळगाव : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्य शताब्दी दिनानिमित्त बेळगावचे रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवडकर यांनी त्यांची रांगोळी रेखाटून अभिवादन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची रांगोळी दीड बाय दोन आकाराची आहे. रांगोळी काढण्यासाठी लिच कलरचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी सात तासांचा कालावधी लागला. सदर रांगोळी …

Read More »

बंट संघाचा वर्धापन दिन ८ मे रोजी

बेळगाव : बंट संघाचा ३८ वा वर्धापन दिन दि. ८ मे रोजी दुपारी चार वाजता बंट भवन येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, सेक्रेटरी चेतन शेट्टी, स्वागत समिती अध्यक्ष प्रभाकर शेट्टी, खजिनदार चेतन शेट्टी उपस्थित होते. …

Read More »

शंकराचार्यांची तत्त्वे समाजहितासाठी पूरक : आमदार अनिल बेनके

बेळगाव : भगवंताच्या कृपे बरोबरच समाजहितासाठी शंकराचार्यांची विचारसरणी आणि तत्त्वे पूरक आहेत, अशी प्रतिपादन बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर धोरण आणि कन्नड व संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी बसवराज कट्टीमणी सभा भवन येथे आयोजित श्री शंकराचार्य जयंती कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

मराठा समाजातर्फे राजर्षी शाहु महाराजांना अभिवादन

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या मेलगे गल्लीतील नवीन इमारतीत शुक्रवारी राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त अभिवादन व मौन कार्यक्रम पार पडला. मंडळाचे सदस्य के.एल. मजूकर यांनी श्री शाहु प्रतिमेचे पूजन केल्यानंतर सर्वानी मौनव्रत पाळून अभिवादन केले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे, ईश्वर लगाडे, नारायण पाटील, विजय जाधव, …

Read More »

3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी …

Read More »

श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी

माजी मंत्री रमेश जारकीहोळी : अथणी येथे माध्यमांशी बोलताना केले भाकीत अथणी : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री व …

Read More »

नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पदभार स्वीकारला

बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आपणाकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. एम.जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगळुरूला व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय: नितेश पाटील मूळ : विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केरुतगी …

Read More »