Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

‘सुवर्णलक्ष्मी’तर्फे ८ रोजी महिला दिन

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गणपती गल्लीतील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे मंगळवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ठिक ४ वा. जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजाननराव भातकांडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा खन्नूकर उपस्थित राहणार आहेत. गणपत गल्ली येथील …

Read More »

वन्यजीवींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

जागतिक वन्यजीव दिन साजरा बेळगाव : वनविभाग व वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला वनविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक अधिकारी विजयकुमार सालीमठ उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपवन संरक्षण अधिकारी जी. पी. हर्षभानू, सामाजिक वनीकरण …

Read More »

धनगरवाड्यावर ‘ऑपरेशन मदत’तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ चे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी व धनगरवाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न करत आहेत. त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यावरील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यात शिक्षणाची ओढ …

Read More »

गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी गाजविली ओपन रॅपिड चेस टूर्नामेंट

 केली परितोषिकांची लयलूट बेळगाव : येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील खुल्या गटात गोल्डन स्क्वेअरच्या प्रकाश कुलकर्णी याने 9 राउंडमध्ये 8 पॉईंट मिळवीत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. अजय चेस अकॅडमीच्यावतीने येथील युनियन जिमखाना सभागृहात ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजण्यात आली होती. …

Read More »

शाहुनगरात सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास विरोध

बेळगाव : बेळगावातील शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारील सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे शाळा बांधण्यास परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन स्थानिकांनी आज जिल्हाधिकार्‍यांना दिले. शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारी 8 गुंठे सार्वजनिक जागा आहे. या जागेत शाळा बांधण्याचा प्रयत्न कट्टीमनी शिक्षण …

Read More »

काकती पोलिसांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बेळगाव : काकती-होनागा येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारी संदर्भात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीना पोलिसांनी अमानुष मारहाण करणाऱ्या काकती पोलिसांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी होनगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. होनगा येथे काल दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादवादीचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. या मारामारीसंदर्भात रितसर …

Read More »

राजीव टोपन्नावर यांचा आपमध्ये प्रवेश

बेळगाव : पूर्वी कन्नड संघटनांचे नेते असलेले, केजेपीमधून राजकीय क्षेत्रात उडी घेतलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले राजीव टोपन्नावर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. राजीव टोपन्नावर यांनी आज पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बेंगळूरच्या आम आदमी कार्यालयात आम आदमी पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. राजीव टोपन्नावर पक्ष बदलामुळे बेळगाव जिल्ह्यात …

Read More »

मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे हाच मराठी भाषेचा गौरव

प्रा. अशोक आलगोंडी – एस जी पाटील पदवी पूर्व महाविद्यालायात मराठी भाषा दिन साजरा बेळगाव : भाषा आदान प्रदानाचे प्रमुख साधन असून मातृभाषेतून शिक्षणाने बौद्धिक विकास लवकर होतो. मराठी भाषा गौरव दिन निमित्त मराठीचा जागर करत असताना मराठी माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करायला हवा. मराठी भाषा समृद्ध आहे. ती सध्याच्या स्थितीत …

Read More »

कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत स्मार्ट क्लासचे उदघाटन

बेळगाव : शाळेच्या चार भिंतीत देशाचं भवितव्य घडत असतं. शिक्षित, सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी नागरिक तयार करण्याचा कारखाना म्हणजे शाळा. म्हणून शाळा ही शाळेसारखी असली पाहिजे. तेथील वातावरण विद्यार्थ्यांना पूरक व पोषक असणं किंबहूना तशी सोय करण ही शिक्षक व पालकांची संयुक्त जबाबदारी आहे. मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच मनोरंजनासह हसत खेळत शिक्षण मिळालं …

Read More »

देवराज अर्स कॉलनी येथे मूलभूत सुविधा द्या

बेळगाव : बसवन कुडची देवराज अर्स कॉलनी येथे मूलभूत सुविधा नसल्याने रहिवाशांना समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी रोड पाण्याची व्यवस्था गटारी पथदीप यासह अनेक गोष्टींचा अभाव असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरपट्टी पाणीपट्टी भरून देखील नागरिकांना वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे देवराज अर्स कॉलनीत …

Read More »