Sunday , September 8 2024
Breaking News

महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे “जोडे मारो” आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंसह दिग्गज सहभागी

  मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले …

Read More »

राजकोट किल्ल्यावरील मूर्ती कोसळल्याप्रकरणी; चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शिवरायांची मूर्ती कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन …

Read More »

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. त्यामुळेच गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील …

Read More »

राजकोट येथील शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

  कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. चेतन पाटील याला …

Read More »

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

  मालवण : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक …

Read More »

समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 3 सप्टेंबर रोजी तुतारी फुंकणार

  कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज (23 ऑगस्ट) कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या …

Read More »

शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांना अभिवादन

  कोल्हापूर : मराठीतील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक महादेव मोरे यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरण चालवली. जगण्यासाठी चाललेल्या विविध व्यापातूनही आपल्या साहित्य लेखणीत कधीही खंड पडू दिला नाही. कथा, कादंबरी, ललित अशा विविध साहित्य …

Read More »

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्वाही कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी …

Read More »

कोल्हापूर येथील अत्याचार व खून प्रकरणी नराधम मामाला बेड्या

  कोल्हापूर : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने …

Read More »

कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या

  कोल्हापूर : शिये (ता. करवीर) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.२२) घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रामनगर येथे गुडूसिंग अग्रहरी हे आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात. ते …

Read More »