एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर महायुतीकडे 236 जागांचं संख्याबळ …
Read More »चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील …
Read More »महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार
सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता …
Read More »26 नोव्हेंबरला महायुतीचे सरकार स्थापन होणार : उद्या नवीन आमदारांची बैठक
मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्तेच्या दिशेने एक पाऊल टाकताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने कळस गाठला. एकनाथ शिंदे यांच्या तसेच भाजप कार्यालयाजवळ जमलेल्या चाहत्यांनी महायुतीने प्रचंड बहुमत मिळताच विजयाच्या घोषणा दिल्या. उद्या नव्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत अंतिम …
Read More »हसुर सासगिरीच्या शांताबाई जटा मुक्त होऊन मतदानाला
गडहिंग्लज : गडहिंग्लज अनिसच्या कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर केल्यावर दहा वर्षे सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार उतरवला आणि 75 वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या. मांगनूर दड्डी येथील श्रीमती शांताबाई या हसुर सासगिरी येथे आपल्या सुमन शिवाजी मांगले या मुलीकडे सध्या राहायला आहेत. यापूर्वी या …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान
करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. …
Read More »महाराष्ट्रात 58.43 टक्के मतदान; ठाण्यात सर्वात कमी
मुंबई : लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा आज महाराष्ट्रात पार पडला. महाराष्ट्राच्या तख्तासाठीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या लढाईतला सर्वात महत्वाचा टप्पा आज पार पडला तो म्हणजे मतदानाचा. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 58.48 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये 69.63 टक्के इतकं झालं तर सर्वात कमी ठाणे जिल्ह्यात …
Read More »विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विरार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची …
Read More »राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार
पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे …
Read More »मतदान केंद्र येती घरा….
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच होय. मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta