Friday , April 17 2026
Breaking News

चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका

Spread the love

 

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना आगीच भडका उडाला. चंदगड तालुक्यातील महागाव येथे शिवाजी पाटील यांचं काही महिला औक्षण करत असताना मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्याने आगीचा भडका उडाला.

नेमकं काय घडलं?

महिला औक्षण करत असताना जेसीबीने शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकण्यात येत होता. आगीच्या भडक्यात काही महिला आणि आमदार शिवाजी पाटील किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आगीच्या भडक्यात नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी

Spread the love  पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *