Sunday , September 8 2024
Breaking News

मुख्य बातमी

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

  नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते …

Read More »

नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सर्व याचिका फेटाळल्या

  नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यासोबतच न्यायालयानं सर्व 58 याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. 4 न्यायाधीशांनी बहुमतानं निर्णय दिला आहे. …

Read More »

वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

  नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला …

Read More »

चालकाला हार्टअटॅक, समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक; ९ ठार, २८ जखमी

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात सूरत : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती. यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली. चालकाला ह्रदयविकाराचा …

Read More »

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन

  वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …

Read More »

चीनसह पाच देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

  नवी दिल्ली : चीन आणि शेजारील देशांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल. जर या देशांतून आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास अथवा त्यांची कोविड १९ …

Read More »

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं नाही, मीच त्यांना आमंत्रण देणार

  बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. …

Read More »

सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …

Read More »

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक …

Read More »