Saturday , April 26 2025
Breaking News

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवता यश आलं.

About Belgaum Varta

Check Also

पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती

Spread the love  नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *