Monday , September 21 2026
Breaking News

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना

Spread the love

 

बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, साधेपणा, विनम्रता आणि जनसामान्यांशी कायम नाळ जपणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त आज बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत कर्नाटकाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे राज्यात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लागली. विशेषतः रेल्वे, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाच्या क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास माजी खासदार मंगला अंगडी, खासदार जगदीश शेट्टर, किरण जाधव, राजन जाधव, अनुप काटे, इरय्या खोत, हनमंत कागलकर, चेतना अंगडी, संजय भंडारी, राहुल मुचंडी, विजय भट, नागराज पाटील, मुक्तार पठाण, सविता करडी, ऍड. महावीरराज पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या लोकसेवेच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. समाजहितासाठी समर्पित नेतृत्वाचा आदर्श त्यांनी घालून दिला असून, त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *