Sunday , July 26 2026
Breaking News

बैलगाडीवानाचा मुलगा बनला ‘अग्निवीर’

Spread the love

 

निपाणीत मिरवणूकीने स्वागत; हालाख्याच्या परिस्थितीतही मिळविले यश

निपाणी (वार्ता) : बेताच्या आर्थिक परिस्थितीत बैलजोडीचे संगोपन करीत बैलगाडी हाकत संसाराचा गाडा ओढणाऱ्या येथील बैलगाडीवानाच्या मुलाने कठिण अग्निवीर परीक्षा पार करत भारतीय सेनेत आपले स्थान भक्कम केले आहे. येथील भीमनगर वसाहतीतील संदीप कांबळे या बैलगाडीवानाचा मुलगा प्रथमेश संदीप कांबळे असे या युवकाचे नाव आहे. तो निपाणी ते येताच बैलगाडीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली.
भारतीय सेनेत सेवा बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून प्रथमेश परिश्रम करीत होता. यासाठी अनेकवेळा भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. रायचूर येथे झालेल्या महार रजिमेंट सागर (मध्य प्रदेश) मध्ये झालेल्या निवड प्रक्रियेतील कसोट्यांवर प्रथमेश उत्तीर्ण झाला. त्याची निवड होऊन प्रशिक्षण झाल्यानंतर कारकिर्दीला सुरवात ठरणारी भारतीय सेनेची कसम परेडही त्याने पूर्ण केली आहे. सध्या तो दिल्ली येथे सेवा बजावणार आहे.
भारतीय सेनेत यशस्वीपणे प्रवेश मिळवित अग्निवीर बनलेल्या प्रथमेश याचे निपाणीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्याची गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक थळोबा पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भिमनगर अशी काढण्यात आली. दरम्यान, निपाणीकरांनी ही त्याचे भरभरून कौतुक केले. शिवाय मिरवणुकीच्या मार्गावर त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तरूणांनी व्यसनांच्या आहारी न जाता देशाच्या सेवेसाठी पुढे आले पाहिजे. सैन्य क्षेत्रातही उज्वल भविष्य घडविता येते. प्रत्येकाने सैन्यात भरती होण्याचे ध्येय ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *