Sunday , July 26 2026
Breaking News

हृदयविकाराने दगावलेल्या गाय मालकांना लाखाची भरपाई देण्याची रयत संघटनेची मागणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दूध उत्पादनातून कुटुंबाला हातभार लागण्याच्या उद्देशाने जत्राट शेतकरी जनार्दन कृष्णा हारदारे यांनी आठ दिवसांपूर्वी बाजारातून १ लाख ३० हजार रुपये किंमतीची गाय बाजारातून खरेदी केली होती. पण अचानक हृदयघाताने सोमवारी (ता.१) रात्री त्या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबीयांना शासनाकडून १५ ते २० हजाराची आर्थिक मदत मिळू शकते. पण ती तोकडी असल्याने संबंधित कुटुंबीयाला १ लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राजकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे.
सोमवारी रात्री गाईला हृदयघात झाल्याचे समजतात रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, पशु अधिकारी डॉ. योहोशवा राज, तहसीलदार सुरेश मुंजे, उपनिरीक्षक पवार, जत्राट येथील तलाठी डी. एल. हाडकर आणि पोलीस अधिकारी प्रकाश नेगिनहाळ यांना घटनेबाबतची माहिती दिली. त्यांनी मंगळवारी (ता.२) घटनास्थळी भेट देऊन गाईची उत्तरीय तपासणी करून पंचनामा केला. याबाबतचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाला पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य मदत मिळावी, यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी मनोहर हरदारे, श्रीकांत वाघमारे, शिवगोंडा हारदारे, एकनाथ जबडे, किरण जोके, विजय हारदारे, दत्तात्रय हारदारे, अमित चौगुले, अमित खोत, रामा वाघमारे, बसू वाघमारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *