Saturday , February 8 2025
Breaking News

चालकाला हार्टअटॅक, समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक; ९ ठार, २८ जखमी

Spread the love

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात

सूरत : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती. यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली. चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा मृत्यू झाला.
या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांपैकी आठजणांचा मृत्यू झाला असून बसमधील २८ जण जखमी झाले आहेत. ११ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस सूरत येथून वलसाडला चालली होती. कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती अशी माहिती नवसारीचे पोलीस अधिक्षक ऋषीकेश उपाध्याय यांनी दिली आहे.
कारमधील सर्व प्रवासी गुजरातच्या अंकलेश्वर येथील आहेत. ते सर्वजण वलसाड येथून आपल्या घरी निघाले होते. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नारा..

Spread the love  नवी दिल्ली : 2025 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अर्थमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *