Sunday , December 22 2024
Breaking News

मुख्य बातमी

टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूलमध्ये, ममतांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश

पणजी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लिएंडरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात पक्ष प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लिएंडर पेस आज तृणमूलमध्ये सामील …

Read More »

खेलरत्न पुरस्काराची घोषणा; नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंना मिळणार पुरस्कार

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणार्‍या खेळाडूंची नावही या यादीत आहेत. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचही नावं …

Read More »

नोव्हेंबर अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची शक्यता

नवी दिल्ली : कोरोना महारोगराईचा प्रकोप लक्षात घेता गतवर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. परंतु, यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने हिवाळी अधिवेशनाचा मार्ग सुकर झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करीत अधिवेशन भरवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान 20 बैठका होणार असून ख्रिस्मसच्या …

Read More »

1971 चे युद्ध मानवतेच्या रक्षणासाठीची ऐतिहासिक लढाई

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह : वायुसेना राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बंगळूर : 1971 चे युद्ध मानवतेच्या आणि लोकशाही सन्मानाच्या रक्षणासाठी लढलेल्या सर्वात ऐतिहासिक लढाईंपैकी एक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. दोन दिवसाच्या राज्य दौर्‍यावर असलेले राजनाथ सिंह यांनी आज बंगळुर येथे भारतीय वायुसेना राष्ट्रीय परिषदेच्या …

Read More »

भूकंपग्रस्त गडिकेश्वरला 8 नोव्हेंबरला केंद्रीय पथक

भूकंपाच्या कारणांचे अध्ययन करणार बंगळूर : उत्तर कर्नाटकात वारंवार होणार्‍या भूकंपाचे कारण शोधण्यात भूगर्भशास्त्रावरील देशातील अग्रगण्य संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांचे एक पथक येत्या 8 आणि 9 नोव्हेंबरला गुलबर्ग्याच्या चिंचोळी तालुक्यातील गडिकेश्वराला भेट देतील. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ …

Read More »

…तर आणखी सर्जिकल स्ट्राईक करू

अमित शहा यांचा पाकिस्तानला थेट इशारा पणजी (वार्ता) : काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे पाकिस्तानने थांबवावे. सीमारेषापलिकडून पाकिस्तानने आपल्या कारवायांवर नियंत्रण न ठेवल्यास आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करु, अशा थेट इशारा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत …

Read More »

कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण झाल्याचं वृत्त निराधार असून या केवळ अफवा आहेत. उलट भारत हा पॉवर सरप्लस देश असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला आहे. हॉर्वर्ड कॅनेडी शाळेत एका वार्तालापादरम्यान ते बोलत होत्या. प्राध्यापक लॉरेन्स समर्स यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. सीतारामण म्हणाल्या, ही निव्वळ …

Read More »

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे. ताप आणि वीकनेस आल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा …

Read More »

किरकोळ महागाईत घट; केंद्राला मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ (सीपीआय इन्फ्लेशन) 4.35 टक्क्यांवर आल्यामुळे देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही चलनवाढही आटोक्यात राहिली आहे. मागील महिन्यात ही चलनवाढ 5.30 टक्के एवढी होती. या चलनवाढीचा दर घटल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही …

Read More »

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरी आज सीबीआयने छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, देशमुख कुटुंबीय …

Read More »