खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक …
Read More »खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »नंदगड उत्तर विभाग कृषी पत्तीनच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल विजयी
बारापैकी सात जागा बिनविरोध, पाच जागांसाठी सहा जण होते रिंगणात खानापूर : नंदगड उत्तर विभाग प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी झाली. या निवडणुकीत कर्जदार सामान्य गटाच्या पाच जागांसाठी सहाजण रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. तर उर्वरित सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सामान्य कर्जदार गटातील पाच जागेसाठी कल्लाप्पा …
Read More »करंबळ (गोवा कत्री) नजीक अपघात; दुचाकीस्वार ठार
खानापूर : दुचाकीस्वाराने चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन कारला ठोकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45) असे असून तो हेब्बाळ गावचा रहिवासी आहे. सदर दुचाकीस्वार आपल्या सीडी डीलक्स दुचाकीवरून हेब्बाळ गावाकडून बेळगावकडे जात असताना करंबळ (गोवा कत्री) बेळगाव -पणजी महामार्गावर असलेल्या ब्रिजच्या डाव्या बाजूनी …
Read More »खानापूर तालुक्यातील शिक्षकांची कमतरता दूर करा : माजी आ. डॉ. अंजली निंबाळकर
शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यातील मुला- मुलींच्या शिक्षणाचा सरकारी शाळाच प्रमुख आधार आहेत. ग्रामीण भागात तर शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची भिस्त पूर्णपणे सरकारी शाळांवर अवलंबून आहे. या शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बंगळूर येथे त्यांनी शिक्षण …
Read More »खानापूर म. ए. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
चिंतन बैठकीत पराभवाची चर्चा! खानापूर : नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. शुक्रवारी खानापूर शिवस्मारक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक व विविध विषयासंदर्भात बैठक बोलावण्यात …
Read More »मणतुर्गा- खानापूर बससेवेला होणार प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा – खानापूर अशी बससेवा सुरू करा, अशी मागणी भाजपचे ग्रामीण सेक्रेटरी व मणतुर्गा गावचे सुपुत्र गजानन पाटील यांनी तालुका भाजप अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेपो मॅनेजर महेश तीरकनावर यांची भेट घेऊन केली. खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, मन्सापूर आदी भागातील नागरीकांना, विद्यार्थी वर्गाला …
Read More »८ जुलै रोजी खानापूर जेएमएफसी न्यायालयात लोक अदालत
खानापूर : खानापूर शहरातील जेएमएफसी न्यायालयात शनिवारी दि. ८ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाण घेवाण, स्थावर प्राॅपर्टी मालमत्ता अशा विविध न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ …
Read More »बेळगाव- खानापूर जादा बससेवेची आम. विठ्ठलराव हलगेकर यांनी केली मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर- बेळगाव महामार्गावरून प्रवाशी, शाळा -काॅलेज विद्यार्थी, तसेच कामगार यांची दररोज बसस्थानकावर बससाठी गर्दी असते. सकाळच्या वेळेत बेळगावला जाण्यासाठी शाळा, काॅलेज विद्यार्थी, प्रवासी, तसेच कामगार शहरासह ग्रामीण भागातून खानापूर बेळगाव असा प्रवास करतात. सध्या खानापूर बेळगाव मार्गावर बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी, …
Read More »खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची डागडुजी अथवा डांबरीकरण झालेच नाही. त्यामुळे सरकारी दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना दुचाकी अथवा चार चाकी गाड्यावरून येताना त्रास होत आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची कधी दखलच घेतली गेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन रोडवरून सरकारी दवाखान्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta