Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

अबकारी खात्याची मोठी कारवाई; 67 लाख 73 हजाराचा मद्यसाठा जप्त

  बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने खानापुर झोन अंतर्गत जांबोटी-खानापुर रोडच्या मोदेकोप्प क्रॉसजवळ आज संध्याकाळी मोठी कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक जयराम जी. हेगडे आणि त्यांचे सहकारी मंजुनाथ बालगप्पा, प्रकाश डोणी हे रस्त्यावर गस्त घालत असताना ब्राउन भारत …

Read More »

खानापूरात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४ व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ येथील लोकमान्य सभागृहात रविवारी दि. ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा होते. तर व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, बीईओ राजश्री कुडची, बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगणीमठ, उद्योजक …

Read More »

खानापूरातील सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करावी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या  लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत …

Read More »

कर्नाटकाच्या समग्र विकासासाठी भाजपला निवडून द्या : राजनाथ सिंह

  खानापूर : पंतप्रधान मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताचा मानसन्मान जगभरात वाढला आहे. जोपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील. देशांप्रमाणेच कर्नाटकाचा समग्र विकास करण्याचे मोदींचे आणि भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात 2/3 स्पष्ट बहुमताने भाजपला निवडून द्या, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. …

Read More »

नंदगडच्या कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुंडलिक हनुमंतराव चव्हाण होते. तर प्रमुख वक्ते म्हणून वैयक्तिक सल्लागार आणि संस्कृती एज्युक्युअरचे संस्थापक तेजस कोळेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुवराह खानापूर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे …

Read More »

कर्नाटक सरकारी नोकर वर्गाच्या संपाला खानापूरातून एकमुखी पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा या मागणीसाठी नोकर संघाच्या वतीने बुधवारच्या संपाला खानापूर तालुक्यातून एकमुखी पाठींबा दिसुन आला. कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने बुधवार दि. १ मार्च रोजी खानापूरात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत विविध विषयांवर चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला नगराध्यक्ष नारायण मयेकर, स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील, उपस्थित होते. यावेळी बैठकीला चीफ ऑफिस आर. के. वटार, नगरसेवक माजी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आप्पया कोडोळी, हणमंत पुजार, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, राजश्री …

Read More »

खानापूरात सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा

  नोकर संघाच्या वतीने आजपासून संप खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने १ मार्च पासून राज्यात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने सरकारी कर्मचारी वर्गाला सातवा वेतन व २००६ पासूनच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चालु करावी. या मागणीसाठी १ मार्च पासून संपावर जाणार असल्याची …

Read More »

आवरोळी मठात विविध कार्यक्रमाने होणार शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम

  खानापूर (प्रतिनिधी) : आवरोळी (ता. खानापूर) येथील श्री रूद्र स्वामी बेळकी आवरोळी मठाच्या आवारात परमपूज्य शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी दि. २ मार्च रोजी सकाळी ९.३० होणार आहे, अशी माहिती मठाधीश पं. पू. चन्नबसव देवरू स्वामी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला …

Read More »

कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्याचे नॅशनल लेव्हल एनएसएस योजनेंतर्गत स्पर्धेत यश

  खानापूर (प्रतिनिधी) : नॅशनल लेव्हल राष्ट्रीय सर्विस योजनेंतर्गत दि. १४ फेब्रुवारी ते दि. २० पर्यंत आम्बाला (हरियाणा) येथील महर्षि मार्केडेश्वर डीम्ड विद्यापीठ येथे देशातील १७ राज्यातील विविध काॅलेजच्या २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन कर्नाटक राज्यातील हाॅल्टिकल्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी शिर्शि …

Read More »