खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …
Read More »जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी पुरुषांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गेल्या तीस वर्षांपूर्वी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तालुक्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगांवकर …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली. यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते. यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज …
Read More »चोर्ला घाटातील दरीत कार कोसळून दोन ठार
खानापूर : चोर्ला घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत असून अपघाताचे सत्र सुरूच आहे काल रात्री या घाटात महाराष्ट्रातील एमएच 48 बीटी 5968 क्रमांकाची कार खोलदरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत. चोर्ला …
Read More »समन्वयक मंत्र्यांनी खानापूरलाही भेट द्यावी; पुंडलिक चव्हाण
खानापूर : दि. 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील व तज्ञ समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सीमावासीयांच्या अडचणी तसेच भावना जाणून घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सीमाप्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासाठी …
Read More »खानापूर तालुक्यात एपीएमसी मार्फत भात खरेदी केंद्रे व कृषी खात्यामार्फत सहाय्यधन द्यावे
शेतकरीवर्गाची मागणीव्दारे तहसीलदाराना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात भात पीक हे मुख्य पिक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले भात विक्री करण्यासाठी एपीएमसी मार्फत भात केंद्र त्वरीत सुरू करावी. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी वर्गाची अवस्था दयनिय झाली आहे. त्यातच २०१९ साली अतिवृष्टीमुळे व त्यानंतर कोरोनाच्या काळात शेतकरी वर्गाचा …
Read More »खानापूर सीपीआयपदी मंजुनाथ नायक
खानापूर : खानापूर पोलीस स्थानकाच्या सीपीआयपदी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली. खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश शिंगे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती सरकारने केली आहे. त्यांनी खानापूर सीपीआय पदाची सूत्रे स्वीकारली. मंजुनाथ नायक हे …
Read More »खानापूरात लम्पी रोगाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे प्रमोद कोचेरी यांचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र जनावरांच्या लम्पी रोगाने धुमाकूळ घातला असून खानापूर तालुक्यातील जनावरांना या लम्पी रोगाची लागण झाली आहे. सध्या खानापूर तालुक्यात जवळपास ७३ जनावरे दगावली आहेत. यासाठी भाजपचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पशु खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोटगी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत दादा पाटील व खासदार धैर्यशील माने हे बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार …
Read More »शांतिनिकेतन पब्लिक स्कूल क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थांच्या ३३ वा राष्ट्रीय क्रिडाकुट २०२२-२३ आयोजित ऍथलेटिक्स २०२२ च्या कुरूक्षेत्र हरियाणा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जवळपास १२०० क्रीडापटूनी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सात क्रीडापटूनी यश संपादन केले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta