Wednesday , April 22 2026
Breaking News

खानापूर

खानापूरात तिकिटासाठी “पाकीट”

  खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाकडून निरीक्षक टीम म्हणून आलो आहोत. उमेदवार निवडीसाठी आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देतो तुम्ही आमचे हात ओले करा, अशाप्रकाचे साटेलोटे खानापूर तालुक्यात होत असल्याची चर्चा सध्या खानापूरात रंगली आहे. कोणता उमेदवार किती ताकदवर आहे याचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही निरीक्षक म्हणून आलो आहोत …

Read More »

हेब्बाळ ग्रा. पं. पीडीओ आरती अंगडी यांची मनमानी

  तालुका पंचायतीचे ईओना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या पीडीओ आरती आंगडी याची मनमानी होत असुन सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जी प्रमाणे कामे करत असून अशा पीडीओ अधिकाऱ्यांची त्वरीत बदली करावी, अशा मागणीचे निवेदन हेब्बाळ ग्रा पं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्याच्या वतीने तालुका पंचायतीचे ईओ अधिकाऱ्यांना …

Read More »

मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील रस्त्याच्या कामानिमित्त शनिवार, रविवार वाहतूक बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वेगेटवर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शनिवारी व रविवारी खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम …

Read More »

शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद करू : के. के. कोप्प वासीयांचा निर्धार

  खानापूर (प्रतिनिधी) : के. के. कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. यावेळी शेतकरी वर्गाने, कोणत्याही परिस्थितीत आपली १ इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही, अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात …

Read More »

जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन

  खानापूर : खानापूर तालुक्यात लम्पिने धुमाकुळ घातला आहे. लम्पिमुळे तालुक्यात अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कारलगा येथे लम्पिमुळे सुनील मनोहर पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. कारलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी तात्काळ पशु …

Read More »

२८ नोव्हेंबर रोजी गंदिगवाडात पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे. तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर …

Read More »

हडलगा, खैरवाड गावचा समितीला एकमुखी पाठिंबा

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेकवाड ग्रामपंचायतीच्या हडलगा आणि खैरवाड या गावांमध्ये पार पडला. म. ए. समितीच्या व्यापक कार्यकारिणीसाठी दोन्ही गावांमधून दोन प्रतिनिधी पाठविण्याचे ठरविले आहे. यावेळी हडलगा येथील सभेचे अध्यक्ष व्यंकोबा ओऊळकर होते. यावेळी गावातील समितीप्रेमी शंकर यळ्ळुरकर, …

Read More »

दोड्डहोसूर, निडगल, तोपिनकट्टीवासीय समितीच्या सदैव पाठीशी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अष्टप्रतिनिधी मंडळाचा दौरा दि. २१/११/२०२२ रोजी रात्री ७ वाजता दोड्डहोसूर येथे गावचे प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण महादेव पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मधू परशराम पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, देवाप्पा पाटील, संजय पाटील, कल्लाप्पा मादार, शंकर पाटील, ईराप्पा …

Read More »

खानापूर-रामनगर महामार्गाच्या कामाला सुरूवात; मातीचा वापर केल्याची तक्रार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षभरापासून कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खानापूर- रामनगर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामात मोहरम टाकून काम करण्याऐवजी केवळ माती टाकून महामार्गाचे काम करण्यात येत असल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकाना …

Read More »

शेडेगाळी गावामध्ये उद्यापासून कटबंद वार

    खानापूर : तालुका खानापूर मौजे शेडेगाळी येथे सात वर्षानंतर होणाऱ्या गोंधळाचे वार दि. 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हे वार दि. 25 नोव्हेंबर (शुक्रवार) दि. 29 नोव्हेंबर (मंगळवार) दि. 2 डिसेंबर (शुक्रवार) दि. 6 डिसेंबर (मंगळवार) असे पाच दिवस पाळण्यात येणार असून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांना तसेच पाहुणे मंडळींना …

Read More »