खानापूर : पूर्वीच्या काळात स्मशानभूमीला महत्त्व होते अन् आजही आहे. सध्याच्या स्मार्ट वैज्ञानिक युगात स्मशानभूमी बद्दलची भीती आणि धास्ती काहीशी कमी होताना दिसत आहे. पण याच स्मशानभूमीत कुणी मुक्काम केल्याची बाब सर्वांनाच अचंबित करणारी ठरेल. खानापूर शहरातील मलप्रभा नदी काठावर असलेल्या एका स्मशानभूमीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शहरांतर्गत …
Read More »निट्टूरच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी कल्लापा बाळाराम कांजळेकर (वय ४९) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे बुधवारी दि. १४ रोजी आपल्या शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेतकरी कल्लाप्पा कांजळेकर याने शेतीच्या कामासाठी विविध बँक व सहकारी संस्थांतुन कर्ज घेतले होते. …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलविण्यात आली आहे. यावेळी खानापूर तालुका आरोग्य केंद्र कार्यालयावर मराठी भाषेत फलक लावावा म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 मे 2023 रोजी …
Read More »हलकर्णी येथील मऱ्याम्मा देवीच्या यात्रेला भाविकांची गर्दी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत मऱ्याम्मा देवीची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवार दि. १३ व बुधवारी दि. १४ असे दिवस साजरी करण्यात आली. यावेळी मंगळवारी सकाळी मऱ्याम्मा देवीला अभिषेक, विधीवत पुजा व गाऱ्हाणे घालुन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्यावर भरून …
Read More »हलकर्णी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष; गटारीत घाणीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासुन लागुन असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाची सुरूवात होत आहे. त्यामुळे गटारीत घाणीचे साम्राज्य असल्याने घाणीचे दुर्गंधी तसेच गटारीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास नागरीकांना होऊन त्यातच डासांचा उपद्रव वाढला आहे. तेव्हा …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे मलप्रभेला गटारीचे स्वरूप!
खानापूर : खानापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभेला नगरपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर शहरात भूमिगत गटारी नसल्यामुळे शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येते तसेच नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीचे पाणी दूषित बनले आहे. मलप्रभा नदीपात्रात गटारीतून वाहून आलेला गाळ, घाण, केरकचरा, टाकाऊ वस्तूंचा नदीपात्रात खच पडला …
Read More »खानापूर वनखाते नेहमीच रस्ता, वीजपुरवठा कामात अडथळा आणतात; तालुका आढावा बैठकीत तक्रार
खानापूर : खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला आहे. तालुक्यातील जंगल भागातील खेड्यांना रस्ते तसेच वीज पुरवठ्याचे काम करताना वन खाते नेहमीच या-ना त्या कारणाने कामात अडथळा आणतात. तेव्हा वन खात्याने सहकार्याची भावना ठेवून जंगल भागातील खेड्यांच्या विकासास सहकार्य करावे. सर्वच कामे कायद्यावर बोट ठेवून करता येत नाही. जंगलातील खेड्यांच्या समस्या …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आम. विठ्ठल हलगेकर यांचा सन्मान
खानापूर : कर्नाटक राज सीनियर सिटीजन असोसिएशन खानापूर घटक च्या वतीने सोमवारी खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्रीफळ शाला देऊन सन्मान कार्यक्रम येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीनियर सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष बनोशी सर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मण पाटील यांनी केले. व …
Read More »भुत्तेवाडी खून प्रकरणी दोघांना अटक
नंदगड : भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा नंदगड पोलिसांना अवघ्या 24 तासात छडा लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय 75) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या व गृहज्योती योजना लागलीच लागू करा; मुख्यमंत्र्यांना निवेदन
खानापूर : राज्यात काँग्रेस सरकार येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उर्जामंत्री के. जे. जाॅर्ज यानी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. मात्र मे वीज बिल दुप्पटीने वाढवुन कर्नाटक राज्यातील जनतेला काँग्रेस सरकारने मोठा शाॅक दिला. यावरून काँग्रेस दाखवायचे दात वेगळे व खायचे जात वेगळे असल्याचे कर्नाटकातील जनतेला दाखवून दिले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta