Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर

कारलग्यात घरावर झाड कोसळून नुकसान; माजी आमदार अरविंद पाटलांचे सहकार्य

  खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना …

Read More »

नंदगड ग्रा. पं. भ्रष्टाचार चौकशीच्या आंदोलनाला माजी ग्रा. पं. सदस्य गुंडू हलशीकराचा पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा अपहार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 सदस्यानी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत …

Read More »

सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खानापूरात जाहीर सभा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना भागधारकांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, रयत संघटना तालुका अध्यक्ष महांतेश राऊत व उपाध्यक्ष अखीलसाब मुनवळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारकात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

करंबळ गावच्या नितीन पाटील याचे शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश

  खानापूर (प्रतिनिधी) : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ बेळगाव टीमचा खेळाडू व करंबळ (ता. खानापूर) गावचा सुपूत्र नितीन पाटील याने राज्य पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करत तीन गोल्ड मेडल जिंकून खानापूरच्या नाव लौकिकात भर टाकली आहे. नुकताच सप्टेंबरमध्ये चित्रदुर्ग, हुईना, व शिमोगा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये …

Read More »

खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेत पेव्हर्स कामाचा शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेच्या पटांगणात एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, एसडीएमसी अध्यक्ष धाकटा गुरव, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकविण्यासाठी तालुक्यात ज्ञानेश्वरी पालकी सोहळा व तुकाराम गाथा पूजन तालुक्यातील गावोगावी करण्याचा निर्धार करण्यात येत असून त्याची जनजागृती करण्यात येत आहे. आज बुधवारी लालवाडी, कारलगा, शिवोली, अल्लेहोळ, हडलगा, खैरवाड, हेब्बाळ, नंदगड या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी समिती …

Read More »

स्वामी विवेकानंद इंग्रजी स्कूलमध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ बुधवारी दि. १९ रोजी करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन जयंत तिनेईकर, सेक्रेटरी ऍड. चेतन मणेरीकर, सुहास कुलकर्णी, अमोल शहापूरकर, …

Read More »

ऊसाला प्रतिटन 3800 रूपये दर मिळावा

  खानापूर तालुका आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2500 दर जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2500 रूपये दर योग्य नाही. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे. सरकारने सर्व बाबतीत दर वाढविला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला दर वाढविला …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध गावातून समितीची जनजागृती

  खानापूर : रामगुरवाडी, नागुर्डे, नागुर्डेवाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, ओत्तोळी, दारोळी, ओलमणी, जांबोटी-वडगांव, जांबोटी, रामापूर बाजारपेठ, कुप्पटगिरी आणि निडगल इत्यादी गावांचा दौरा करून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा ग्रंथपूजन करून सीमा पालखीचे उद्घाटन करण्यासाठी जनतेला आमंत्रित करण्यात आले आहे. रामगुरवाडीहून ज्येष्ठ नागरिक शंकरराव सावंत, विश्रांतवाडीहून राजू कुंभार, …

Read More »

“शांतीनिकेतन”च्या क्रीडापटूंची राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : बळ्ळारी येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्याभारती राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खानापूरमधील शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली असून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या क्रीडापटूंची निवड हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी करण्यात आली आहे. बळ्ळारी येथे झालेल्या राज्यस्तरीय …

Read More »