खानापूर : खानापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसचे युवा नेते व इच्छुक उमेदवार इरफान तालीकोटी यांनी ताबडतोब बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली असुन पत्रकारांनी आपण बंडखोरी करणार काय असे विचारले असता ते म्हणाले की, आपण …
Read More »सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही, यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक …
Read More »खानापूरातील नव्या सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उद्घाटनाचा मुहूर्त नविन आमदारांच्या हस्ते होण्याचे संकेत?
सध्या आचार संहितेचा बडगा? खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्यासाठी २० कोटी रूपयाचा निधी वापरून नविन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या कचाट्यात सापडल्याने नविन सरकारी दवाखान्याच्या इमारतीचा उदघाटनाचा मुहूर्त आता कधी मिळणार की कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला प्रारंभ …
Read More »जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान
खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असतानाच या निवडणुका पाठोपाठ राज्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणूका देखील होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदार संघ पुनर्रचना झाली असून केवळ इतर मागास वर्ग आरक्षण जाहीर करणे शिल्लक राहिले आहे. येत्या आठ दिवसात हे आरक्षण देखील जाहीर होणार असून राज्य …
Read More »समर्थ इंग्रजी स्कूलचा क्रिडोच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न
खानापूर (प्रतिनिधी) : पूर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक पध्दतीत बदल घडवून नविन संकल्पनेची जोड देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी लावण्यासाठी खानापूर येथील समर्थ इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी क्रिडोच्या माध्यमातून जागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. याजागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून क्रिडोच्या पध्दतीचा अवलंब करून एल के जी, यू …
Read More »लोंढा चेकपोस्टवर 25 मिक्सर पोलिसांच्या ताब्यात
खानापूर : कोणताही परवाना किंवा खरेदी बिल नसलेली मिक्सर ग्राइंडरची अनधिकृत वाहतूक करणारे वाहन लोंढा (ता. खानापूर) चेक पोस्टवर खानापूर पोलिसांच्या मदतीने निवडणुकीच्या नोडल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. 62 हजार 500 रुपयांचे 25 मिक्सर ग्राइंडर व चारचाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी 29 चेकपोस्ट …
Read More »खानापूर नगरपंचायतीची कारवाई, फुटपाथवरील दुकानाचे स्टॅन्ड फलक काढण्यावरून गोंधळ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचातीकडून खानापूर शहरातील बेळगांव पणजी महामार्गावरील दुकानाचे स्टॅन्ड फलक पूर्वकल्पना न देताच गुरूवार दि. २३ रोजी काढण्यास प्रारंभ करताच नेल्सन बुक स्टॉलचे मालक जाॅर्डन गोन्सालवीस आणि खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार यांच्यासह कर्मचाऱ्यांत वादावादीचे प्रसंग घडून आले. खानापूर नगरपंचायतीने दुकानदाराचे स्टॅन्ड फलक काढण्याची …
Read More »खानापूर म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
खानापूर : सर्व प्रकारची आमिषे दाखवून तसेच पैसे देऊन सभांना लोक जमवण्याची वेळ राष्ट्रीय पक्षांवर आली आहे. मात्र, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेपुढे त्यांची सर्व आमिषे निष्क्रिय ठरली आहेत. निष्ठेच्या जोरावरच बेळगावसह खानापूर तालुक्यावर समितीची सत्ता स्थापन होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार …
Read More »खानापूर पोलिसांकडून प्रभूनगर व कानसीनकोपजवळ २५ लिटर गावठी दारू साठा जप्त
खानापूर (प्रतिनिधी) : प्रभूनगर व कामसीनकोपजवळील देवलट्टी (ता. खानापूर) गावाजवळ २५ लिटर गावठी दारू छाप्पा टाकून मंगळवारी दि. २१ रोजी सायंकाळी जप्त केला. याबाबत खानापूर पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, प्रभूनगर (ता. खानापूर) गावातील प्रभूदेव मंदिराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपी गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. …
Read More »खानापूर पोलिसांकडून तिर्थकुंडेजवळ १५ लिटर गावठी दारू साठा जप्त
खानापूर (प्रतिनिधी) : तिर्थकुंडे (ता. खानापूर) गावाजवळील स्वामी हाॅटेल जवळ सोमवारी दि. २० रोजी सायंकाळी गावठी दारू विकत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली. लागलीच खानापूर पोलिसस्थानकाचे सीपीआय रामचंद्र नाईक यानी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. मात्र आरोपी पोलिसांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta