Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर समितीची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी गोपाळ देसाई

  खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेवर अखेर पडदा पडला. 2018 पासून दोन गटात दुभंगलेली समिती एकत्र आणण्यासाठी तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्ते व नेते मागील सहा महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांच्या मध्यस्थीने एकीची प्रक्रिया पूर्णत्वास आली. खानापूर समितीमध्ये झालेली एकी ही समितीच्या विजयाची …

Read More »

मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर “सामान्य ज्ञान परीक्षा 2023”

  खानापूर : राणी चन्नम्मा विद्यापीठ व बेळगाव जिल्हा या दोन स्तरावर “सामान्य ज्ञान परीक्षा 2023 “आयोजित 9/1/2023 रोजी महाविद्यालयात करण्यात आले होते. ही परीक्षा पदवी पूर्व व पदवी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये दहा पेक्षा जास्त कॉलेजमधून तीनशे विद्यार्थी सहभाग घेतले होते. या उद्घाटन समारंभासाठी माजी प्राचार्य …

Read More »

गोवा मॅरेथॉन स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांचे अभिनंदनीय यश

  खानापूर : गोवा हेल्थ फाउंडेशनमार्फत रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी पणजी येथे २१ कि.मी. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कल्लाप्पा तिरविर यांनी १ तास ४७ मि. नियोजित अंतर पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एकीकडे युवा पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना खानापूर सारख्या तालुक्यातील युवकांना कल्लाप्पा …

Read More »

खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्राच्यावतीने “हर घर भगवा, हर घर शिवबसव” अभियान

  खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्राच्यावतीने “हर घर भगवा, हर घर शिवबसव” अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचे परमपूज्य श्री.चन्नबसव स्वामीजी अवरोळी, परमपूज्य श्री. सिद्ध शिवयोगी शांडिल्यश्वर मठ हिरेमुनवळी, दिव्यसानिध्य दिवयचेतन शिवपुत्र महास्वामीजी आरूढ मठ चिक्कमुनवळी, वेदमूर्ती श्री. गुरुसिद्धय्या स्वामीजी कलमठ पारिश्वाड, शांतय्या स्वामीजी हिरेमठ, भाजप जिल्हा ग्रामीण …

Read More »

कोरोना काळातील बंद बसेस पूर्ववत सुरू करा

  आम आदमी पक्षाचे केएसआरटीसीला निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्यावतीने खानापूर केएसआरटीसी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात बंद असलेल्या बसेस पूर्ववत करा. व इतर समस्या सोडवा, असे निवेदन सोमवारी दि. ९ रोजी देण्यात आले. …

Read More »

पुण्यात बेळगावकर एकता ग्रुपची स्थापना

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-बेळगाव या मूळ परिसरातील पण सध्या रायकर माळा, धायरीगाव पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक हेतूने “बेळगावकर एकता ग्रुप” या संघटनेची स्थापना केली. या ठिकाणी खानापूर-बेळगाव व तत्सम परिसरातील साधारण ५० कुटुंब आहेत. अनेक विधायक कार्यासाठी आणि सणोत्सव साजरे करण्यासाठी ही मंडळी एकत्र येत …

Read More »

खानापूर भाजपच्या वतीने विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांचा वाढदिवस साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भाजप नेते विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांचा ६१ वा वाढदिवस भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी भाजप नेते किरण यळ्ळूरकर, राजेंद्र रायका, जोतिबा रोमानी, वासंती बडगेर, सौ. देसाई, वसंत देसाई, आप्पया कोडोली, लक्ष्मण बामणे, …

Read More »

गुंजीत श्रमदानातून रस्ता दुरुस्त; युवकांचा स्तुत्य उपक्रम

  खानापूर : गुंजी ता. खानापूर येथे पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून मधोमध कालवा पडला होता. त्यामुळे दुचाकी बरोबरच चार चाकी वाहनेही रस्त्यावरून चालवणे दुरापास्त झाले होते. गुंजी येथील रेल्वे टेशन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना वाहन चालविणे अत्यंत धोक्याचे व त्रासदायक बनले होते. हा …

Read More »

अबनाळीत १० लाख रूपये अनुदानातून सीसीरोडच्या कामाचा शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : अबनाळीत (ता. खानापूर) येथे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यानी मंजूर केलेल्या मुख्यमंत्री विषेश अनुदान अंतर्गत ५०, ५४ या योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या एक किलो मीटर अंतराच्या रस्त्यासाठी १० लाख रूपये खर्चून सीसीरोड कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते भुमी …

Read More »

तोपिनकट्टी संचालित शांतिनिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरूवारी दि. ५ रोजी शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला सुगर्सचे चेअरमन, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर होते. तर व्यासपीठावर शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »