Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर

सीमाबांधवांचा कोल्हापुरात उद्या एल्गार!

कोल्हापूर : गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणार्‍या सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ’आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या …

Read More »

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार प्रकरणी खानापूरातील हिंदू संघटनांच्यावतीने निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूना न्याय, सरंक्षण व जिहादीवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबावासाठी खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनाच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना बुधवारी दि. 27 रोजी निवेदन देण्यात आले. येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवस्मारकातून तहसील कार्यालयावर मोर्चाव्दारे तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्यामार्फत …

Read More »

जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची भेट

खानापूर : जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने केम्पेगौडा नगर बेंगळुरू येथील गवीपुरम गंगादेश्वर शिवमंदिरचे स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची नुकतीच भेट घेतली आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अभिलाष देसाई यांनी मंजुनाथ स्वामीजींना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची …

Read More »

‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा

मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण खानापूर युवा समितीतर्फे इशारा बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी खानापूर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांची भेट घेऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती व युवा समितीचा उत्स्फूर्तपणे सहभाग

बेळगाव (वार्ता) : आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. आपल्या न्याय हक्कासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळराव देसाई, गोपाळ …

Read More »

काळ्यादिनी व कोल्हापूरातील धरणे आंदोलनासंदर्भात खानापूर म. ए. समितीकडून जागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन मराठी भाषिक जनतेने गांभीर्याने पाळावा. सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी कडकडीत हरताळ पाळावा. तसेच शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष्य वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

वन हक्कासाठी खानापूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा

अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन खानापूर (प्रतिनिधी) : वन हक्कासाठी काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयावरील मोर्चाला निवेदन स्विकारण्यास तहसीलदार रेश्मा तालिकोटी उपस्थित नव्हत्या. तालुक्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊन न्याय देऊ असे फोनव्दारे सांगून उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक पिढ्यापासून जंगलात …

Read More »

अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट; युवा समितीकडून कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेटखानापूर : बाल कल्याण खात्याच्यावतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले.अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना लशीबाबत आढावा

बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोरोना लशीबाबत आढावा घेतला तसेच तालुक्यातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी आरोग्य खात्यातर्फे तालुक्यातील एक लाख 62 हजार लोकांना पहिला तर 75312 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशी माहिती …

Read More »