खानापूर (विनायक कुंभार) : शहरा लगतच्या शिवाजी नगरातून खानापूर-जांबोटी रोड जातो. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी गतिरोधकांची मागणी होत आहे. महिनाभरात शिवजीनागरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगरात प्रवेश करताना रेल्वे बोगदा उतरताना उतार आहे. तर दुसऱ्या बाजूने …
Read More »हंदूर येथील घर कोसळून झाले दोन महिने पण नुकसानभरपाईसाठी महसूल खाते निद्रिस्त
खानापूर (विनायक कुंभार) : सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराला महसूल विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महसूल विभाग हे अतिसंवेदनशीलतेची भूमिका बजावत असते. त्याच्या विरोधात येथील महिलेने सरकारी अधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करून पडझड झालेल्या घराचा पुन्हा एकदा पंचनामा करून घर देण्याची मागणी केली. केरवाड (ता.खानापूर) ग्रामपंचायत क्षेत्रातील …
Read More »बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे. तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये …
Read More »खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने आंदोलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन खानापूर (प्रतिनिधी) : भाषिक अल्पसंख्याक कायद्याची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने उपस्थित …
Read More »काटगाळी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
खानापूर : शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय केंद्र पातळीवरील प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेत काटगाळी (ता. खानापूर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हत्तरगुंजी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेत या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक, अडथळा शर्यत धावणे दिया मोहिते हिने प्रथम क्रमांक, शिवम चौगुले याने …
Read More »मुसळधार पावसाने नंदगडात गटारी तुंबल्या, गटारीचे पाणी दुकानात!
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावच्या नंदगड- हलशी स्टॅन्ड जवळील दुकानांमध्ये नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले. त्यातच गटार तुंबल्याने गटारीचे पाणी नंदगडमधील कलाल गल्लीतील हलशी स्टँड जवळील बाळेकाइ बंधूंच्या दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे त्यांच्या दुकानाच्या व्यापारामध्ये परिणाम झाला. याचा मनस्ताप दुकानदार मालकाला सहन करावा लागला. नंदगडमधील बाजारपेठ व …
Read More »खानापूर तालुका अतिथी शिक्षकांच्यावतीने बीईओ राजेश्वरी कुडची यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन खानापूर तालुक्याचे बीईओ राजेश्वरी कुडची यांना नुकतेच देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अतिथी शिक्षकांना प्रत्येक महिण्याला पगार मिळावा, जे अतिथी शिक्षक बसने शाळेला जातात. त्यांना कमी दरामध्ये बसपासची सोय करावी. सरकारी शिक्षकाप्रमाणेच अतिथी शिक्षकांनासुध्दा प्रशिक्षणामध्ये सामावून घेऊन …
Read More »खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने हेस्काॅम, नगरपंचायतीला निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात पावसाळा असल्याने पावसामुळे खानापूर शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गणेश दर्शनासाठी खानापूर तालुक्यातील अनेक गावचे नागरीक शहरात येतात. यावेळी नागरीकाची गैरसोय होऊनये. यासाठी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच रस्त्यावरील पथदिपांची व्यवस्था करावी. तसेच मलप्रभा नदीघाटावर …
Read More »विठ्ठल हलगेकर “विजयरत्न”ने सन्मानित
खानापूर (श्रीपाद वसंत उशिनकर) : खानापूर येथे शांतीनिकेतन या नावाने मोठी ज्ञानाची गंगा व कॉलेज, श्री महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन श्री. विठ्ठल हलगेकर यांना बेंगलोर विजयवानीतर्फे “विजयरत्न” हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More »विभागीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे उल्लेखनीय यश
खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी येथे झालेल्या गुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सांघिक खेळामध्ये मुलांच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तर रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. वैयक्तिक खेळामध्ये गुरुप्रसाद संजय गावकर उंच उडीमध्ये प्रथम, वरूणा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta