Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

नेरसा अर्भक प्रकारातील संशयित पोलिसांच्या जाळ्यात

  खानापूर : ता. 28 रोजी बेळगांव वार्ताने नेरसे गवळीवाड्यातील नवजात अर्भक बेवारस नसून ते अल्पवयीन प्रेमीयुगलांचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जाणीव करून दिली होती. आता याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे संशयिताचे नाव आहे. …

Read More »

शिंदे कुटुंबियांचे आमदार निंबाळकराकडून सांत्वन

खानापूर : सोमवारी दि. 29 रोजी विजेच्या धक्क्याने मृत पावलेले माचीगड ग्रामपंचायत वाटरमन रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांत्वन केले. यावेळी वडील राजाराम शिंदे, पत्नी रूपाली शिंदे त्यांची लहान मुले यांच्यासोबत आमदार निंबाळकरानी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात हेस्कॉम सोबत बोलणे केले असून …

Read More »

मेरडा जनसेवक क्रीडा संघाच्यावतीने शनिवारी कबड्डी स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे असून अग्निपथ सैन्य भरतीत अग्निवीरांचे भरतीचे वय योग्य नाही. निवृतीनंतर भविष्यात …

Read More »

बरगाव पिडीओंसह ता. पं. कडून सीईओंच्या आदेशाचे उल्लंघन

  खानापूर (विनायक कुंभार) : बरगाव ग्रा. पं. चे कर वसुलीदार रामलिंग रुद्राप्पा पाटील आणि लिपिक गावडू विठोबा पाटील यांनी खोट्या कर पावत्या वापरून कर वसुली, खोट्या सह्या करून नाहरकत पत्र दिले होते, या प्रकरणासंदर्भात सदस्या पद्मश्री पाटील यांनी १६ मे रोजी पुराव्यानिशी जि. पं. सीईओंकडे कारवाईची मागणी केली होती. …

Read More »

खानापूरातील पर्यटन स्थळांना विकासाची आतुरता

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला जांबोटी, कणकुंबी परिसर आहे. पर्यटनाचा खजिना असूनही आतापर्यंत दुर्लक्षितच आहे. येथील स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. अशी स्थळे विकसित करून पर्यटकापर्यंत पोहोचविल्यास शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण …

Read More »

माणिकवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन….

  खानापूर : के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालय बेळगाव आणि प्रा. शंकर आप्पाणा गावडा, सौ. प्रिती परशराम गोरल, ग्रा. पं. सदस्य माणिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव सोमाना हलगेकर, प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते …

Read More »

वॉटरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  खानापूर :  बिजगर्णी (माचीगड) ग्राम पंचायतचे वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे (वय 42) यांना विजेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 29 काल दुपारी बिजगर्णी (माचीगड) येथे घडली. रामचंद्र हे गेल्या 8 वर्षांपासून पंचायतीमध्ये कार्यरत होते. नेहमी प्रमाणे काल सोमवार दि. 29 रोजी स. 11 च्या सुमारास पंपसेट सुरू करत …

Read More »

खानापूरात गणेशोत्सव निमित्ताने पोलिस पथसंचलन

खानापूर (प्रतिनिधी) : येत्या बुधवारी दि. ३१ रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधुन शहरासह तालुक्यातील गावोगावी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २९ रोजी खानापूर शहरात पोलिस खात्याच्या वतीने पथसंचलन काढून जनतेला शांततेत व उत्साहात गणेशोत्सव ११ दिवस साजरा करण्याचे आवाहन …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाला विरोध

  अध्यक्ष भैरू पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारकातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे …

Read More »