खानापूर : माजी सैनिक मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लि खानापूरच्या वतीने 77 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही सुरू करण्यात आली. संस्थेचे चेअरमन जयराम पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सोसायटी कर्मचारी उपस्थीत होते. …
Read More »परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे आमदारांनी थाटले ऑफीस!
महादेव कोळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यांचा घाणाघात…. खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून खानापूरसाठी भव्य असे देवराज अर्स भवन मंजूर करून आणले व सुंदर अशी इमारत बांधली व त्यांनी या इमारतीचे उदघाटन सुद्धा केले. खानापूर तालुक्यामध्ये आमदारांसाठी तालुका पंचायतच्या कंपाऊंडमध्ये मोठे ऑफीस …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीने ऍड. सुधीर चव्हाण यांचा सत्कार
जांबोटी : उचवडे ता. खानापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुधीर चव्हाण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव बार असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हासनेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व …
Read More »खानापूर समितीकडून मध्यवर्ती समितीकडे यादी सुपूर्द
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या कार्यकारिणीवर घेण्यासंदर्भात खानापूर समितीच्या 22 सदस्यांची नवीन यादी आज शुक्रवारी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मालोजी अष्टेकर यांची भेट घेऊन सदर यादी त्यांच्याकडे सुपूर्द केली. खानापूर समितीने नुकतीच …
Read More »कणकुंबी तपासणी नाक्यावर 27 लाख किंमतीची दारू व ट्रक जप्त
खानापूर : दारूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकूण 52 लाख 52 हजार 398 रुपये किमतीच्या गोवा येथून येणारा अशोक लेलँड कंपनीचा 12 चाकी ट्रक (जे. जी. 03, बी. टी. 6735) यामध्ये एकूण 1093.4 लिटरची दारूसह अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी सुरल क्रॉस येथे ही कारवाई केली. या …
Read More »नंदगड पोलिस स्थानक हद्दीत घरफोडी; पाच तोळे दागिन्यासह रोख रक्कम लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी तसेच करंजाळ येथे दोन ठिकाणी एकाच दिवशी घरपोडी करून पाच तोळे दागिन्यासह तीस तोळे चांदीसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दोन्ही घराचे दरवाजे समोरून कुलूप तोडून चोरट्याने घरातील तिजोरी निकामी करून त्यातील सदर ऐवज लांबविला असून याप्रकरणी नंदगड पोलीसात या प्रकरणाची …
Read More »तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अबनाळी शाळेचे वर्चस्व!
खानापूर : मीलॉग्रेस चर्च शाळा खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. मुलांच्या प्राथमिक विभागातून सचिन डिगेकर, कृष्णा मेंडीलकर, शंकर खैरवाडकर तसेच मुलींच्या प्राथमिक विभागातून गीता डिगेकर, प्रेमीला मेंडीलकर, समीक्षा गावकर, वर्षा मेंडीलकर, ममता गावकर या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ …
Read More »ग्रा. पं. सदस्य उदय भोसले यांच्या वतीने करंबळात अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले (कौंदल) यांच्या वतीने ग्रामपंचायतीचे नुतन अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा सौ. सुनंदा यल्लापा इरगार तसेच माजी अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष नारायण पाटील यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. १६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रास्ताविक सेक्रेटरी मारूती …
Read More »खानापूरात आम. विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार संपर्क कार्यालयाचे शानदार उदघाटन
खानापूर : खानापूर तालुक्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी ९२ हजार मताधिक्यानी विजय प्राप्त करून खानापूरात इतिहास घडविला. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या मागण्या वाढल्या, समस्या सोडविण्यासाठी खास आमदार कार्यालयाची मागणी सातत्याने होत असल्याने खानापूर शहरातील शिवाजी नगरात देवराज अर्स कृषी कार्यालयाच्या इमारतीत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार संपर्क कार्यालयाचे …
Read More »खानापूरात माध्यमिक शाळा झोनल क्रीडा स्पर्धाना प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या पटांगणावर खानापूर झोनल माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा प्रारंभ गुरूवारी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी शाळेचे सचिव डाॅ. डी. ई. नाडगौडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीईओ राजश्री कुडची, डॉ पी. एन. पाटील, शंकर कम्मार, डॉ एन. एल. कदम, मुख्याध्यापक सलिम …
Read More »