खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी …
Read More »खानापूर भूविकास बँकेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड; दोन जागांसाठी 28 रोजी मतदान
खानापूर : खानापूर तालुका भूविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक 15 संचालकांपैकी 13 संचालकांची बिनविरोध निवड रविवारी पार पडली. परंतु कक्केरी व गर्लगुंजी या दोन जागांवर एकमत न झाल्याने या दोन जागांसाठी 28 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. खानापूर भूविकास बँकेचे माजी चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची सलग चौथ्यांदा संचालक पदी …
Read More »मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले. शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे …
Read More »खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील लोकमान्य भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वर मंदिर येथून ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे. तसेच ग्रंथ दिंडीच्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज लावून परीसर भगवामय …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांची तीन दिवशीय शैक्षणिक रवाना!
खानापूर : सहल हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतो. सहल म्हणजे विद्यार्थी जीवनातील रोमहर्षक अनुभव असतो. मराठा मंडळ शिक्षण संस्था अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना महत्त्व देणारी शिक्षण संस्था असल्याने अशा शैक्षणिक उपक्रमांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू या नेहमीच प्राधान्य व प्रोत्साहन देत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी …
Read More »खानापूरात रविवारी रंगणार गुंफण साहित्य संमेलन!
बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) खानापूर येथील लोकमान्य भवन आयोजित करण्यात आलेल्या गुंफण सदभावना मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. तसेच संमेलनाला महाराष्ट्र, गोवा व सीमाभागातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यामूळे अनेक ठिकाणी फलक लावण्यासह पताका व …
Read More »बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित अधिवेशनाला खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय आज शुक्रवारी खानापूर येथील शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे …
Read More »खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन
खानापूर : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी शिवस्मारकाजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले व खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. देशवासीयांना ते आदरणीय आहे पण मनुस्मृतीवाल्यांना संविधान …
Read More »भारतीय सैन्यात नव्याने रुजू होणाऱ्या मराठा मंडळ ताराराणीच्या विद्यार्थिनींचा सत्कार!
खानापूर : मराठा मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला समस्त शिक्षकवृंदाला दिला असून भारतीय शेतकरी आणि जवान यांच्याप्रती आदर भावना कायम ठेवण्यास उपकृत केले आहे. म्हणूनच आज …
Read More »हलगा ग्रामपंचायत अध्यक्षावरील अविश्वास ठरावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द
खानापूर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हलगा व चापगाव येथील ग्राम पंचायत अध्यक्षांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली आहे त्यामुळे अविश्वास ठरावाचा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह चापगाव पंचायतीच्या अध्यक्षांवर अविश्वास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta