Sunday , July 26 2026
Breaking News

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू

Spread the love

खानापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली.

मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे असून तो आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ गेला होता. त्याला पोहता येत असल्याने तो नदीपात्रात उतरला; मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि भोवऱ्यात अडकल्याने तो वाहत जाऊन बुडाला, अशी माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच खानापूर व नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, यडोगा गावात सार्वजनिक गणेश विसर्जन उत्सव साध्या पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. मृतकाच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन सणासुदीला झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *