Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता, खानापूर-असोगा-मणतुर्गे रस्ता, गर्लगुंजी-इदलहोंड रस्ता, लालवाडी-चापगाव-अवरोळी रस्ता, हलशी-हलगा-मेरडा-नागरगाळी रस्ता नव्याने पुनर्बांधणी करण्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज दि. २३ जुलै रोजी खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरुन गोव्याला जाणारी अवजड …

Read More »

खानापूर तालुक्यात वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा अभाव: डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलला नुकत्याच दिलेल्या भेटीने खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांची नितांत गरज अधोरेखित केली. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये जाऊन खानापूर तालुक्यातील हर्षदा घाडी या महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. या रुग्णाला आमगाव (ता. खानापूर) येथून अत्यंत गंभीर अवस्थेत बांबूच्या सहाय्याने तिरडीप्रमाणे …

Read More »

आमगावच्या महिलेला डॉ. अंजलीताई फाउंडेशनची मदत

  खानापूर : मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव गावात हर्षदा घाडी नावाच्या महिलेला छातीत दुखत असल्याने सदर महिलेला मुसळधार पावसात गावकऱ्यांच्या सहकार्याने खांद्यावर उचलून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. खानापूरमधील असुविधांमुळे सातत्याने असे प्रकार पुढे येत असून घडल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. जन्म-मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेला गावकरांनी …

Read More »

अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ निश्चित!

  बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी …

Read More »

दुचाकीवरून पडल्याने आशा कार्यकर्ती ठार

  लोंढा : लोंढा येथून रामनगरकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने लक्ष्मी झरंबेकर (वय 45) रा. मुंडवाड तालुका खानापूर ही आशा कार्यकर्ती ठार झाली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. तेथून परत आपल्या गावाकडे जाताना एका दुचाकीस्वाराने …

Read More »

नियती फाऊंडेशनतर्फे खानापूर न्यायालयात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

  खानापूर : नियती फाऊंडेशन आणि गुरुदेव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएमएफसी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश हिरेमठ हे उपस्थित होते. यावेळी बसवराज हपळ्ळी, ऍड. आर. एन. पाटील यांच्यासह वकील वर्ग, …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; चापगाव येथे अनेक घरांची पडझड

  खानापूर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस रविवारीही कायम होता. कणकुंबी, जांबोटी, भीमगड, लोंढा, नागरगाळी वनपरिक्षेत्रात नेहमीप्रमाणे पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. भीमगड अभयारण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भांडुरी  भरला आहे. त्यामुळे देगाव-हेमाडगा आणि पाली-मेंडील गावांमधील रस्ता आणि पुलावरून अनेक फूट पाणी वाहत आहे. …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजला 22 व 23 रोजी सुट्टी

  बेळगाव : बेळगाव, खानापूर परिसरात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 34 (एम) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या आणि पदवीधरपूर्व (12 वी पर्यंत) बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार दिनांक 22 व मंगळवार …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नदी-नाल्यांची पाणी पातळी तपासली. तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : प्रति वर्षाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर इयत्तेतील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गावातील शाळांमध्ये एकत्र शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूरमधील शिरोली केंद्रावर हा वितरणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख …

Read More »