Saturday , March 22 2025
Breaking News

मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात पालक जागृती अभियान संपन्न

Spread the love

 

खानापूर : उत्तम शैक्षणिक उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षक, पालक आणि बालक एका समान रषेत आले पाहिजेत. जेव्हा ते एका समान रेषेत येतात तेव्हाच शैक्षणिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे गृहीत धरून मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पालक जागृती अभियान घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात पोषक संवाद घडण्याची गरज असते. बरेच विद्यार्थी अनेक समस्यांचा सामना करीत असतात. पालक आणि शिक्षकांचा संवाद हरवल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीना अभ्यासाचे पोषक वातावरण तयार करण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियानाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्रीमान अरविंद पाटील, व्यासपीठावर पालक प्रतिनिधी श्रीमान महादेव कदम, श्रीमान सचिन देसाई, श्रीमती शीला पवार, श्रीमती रीना बिदरभावी, प्राध्यापक एन. एम. सनदी पालक वर्ग उपस्थित होते.
सर्व उपस्थित पाहुण्यांचे, पालकांचे स्वागत कॉलेजच्या विद्यार्थिनींनी करावकेच्या संगीत साथीने मंजूळ आवाजात स्वागत केली. सर्व उपस्थित पालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्राध्यापिका मनिषा एलजी यांनी अभ्यासाचे “तंत्र आणि मंत्र” या विषयावर सहप्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. तर प्राध्यापिका दीपा निडगलकर यांनी “मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात हरवलेले वाचन, पाठांतर आणि चिंतन” या विषयावर मार्गदर्शन केले. प्राध्यापक एन. एम. सनदी यांनी “शालेय शिस्त आणि संयम अध्ययन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पालक प्रतिनिधी श्रीमान महादेव कदम, श्रीमान सचिन देसाई, श्रीमती शीला पवार, श्रीमती रीना बिदरभावी यांनी “पालक म्हणून माझी जबाबदारी काय?” हे मांडताना “मुली अभ्यासात का कमी पडतात याच कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर आहे, अभ्यासात पुढे जायचे असेल तल मोबाईलपासून सुटका करून घ्यावी लागेल, नेटकं वेळेचे नियोजन करावे लागेल, पुस्तकांना मित्र बनवावे लागेल, लिखानाला चालना द्यावी लागेल अशा आशयाचे प्रखर विचार मांडले व ताराराणीतील शिक्षक वर्गाने घेतलेल्या कष्टांचे तोंडभरून कौतुक केले.
अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांनी व्यवस्थापन आणि नियोजन यांचा छान संगम सोबतीला असेल तर उच्चतम यश साध्य करता येते आजवर ताराराणी महाविद्यालयांने याचा उत्तम नमुना दाखवला आहे. पालकांनी शिक्षकांच्या सोबतीने राहावे अडीअडचणी निदर्शनास आणाव्यात व विद्यार्थिनींना उज्ज्वल यश संपादन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यानंतर काॅलेजने घेतलेल्या पहिल्या चाचणीच्या उत्तरपत्रिकांचे अवलोकन करण्यास पालकांना निवेदन करण्यात आले पालकांनी आपल्या पाल्यांसमवेत सदर उत्तर पत्रिका व मिळालेल्या गुणांचे चिंतन खुल्यादिलांने केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका सोनाली पाटील यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे पालकांचे, प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे नेमक्या शब्दात आभार मानले. प्राध्यापिका आरती नाईक, प्राध्यापक नितीन देसाई यांनीही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका ऋतू विजय पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर : हलशीवाडी येथे खांब बदलण्याचे काम सुरू; ग्रामस्थांमधून समाधान

Spread the love  खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *