नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीप प्रज्वलन सोसायटीचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, सेक्रेटरी के. एन. पाटील, संजय मजूकर, रवींद्र गिंडे, प्रा. सी. एम. गोरल, चांगाप्पा उघाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील यांनी केले. प्रस्ताविक सोसायटीचे संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले.
यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, संस्थेने गेल्या 23 वर्षात खूप चांगली प्रगती साधली असून, संस्थेच्या येळ्ळूर व वडगाव या ठिकाणी स्वतःच्या इमारती आहेत, त्याचबरोबर संस्थेच्या वतीने आम्ही येळ्ळूर गावामध्ये सामाजिक बांधिलकी जपत नेताजी मंगल कार्यालयाची उभारणी केली आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे.
यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल 55 कोटीच्या वर असून, संस्थेने तीन कोटीच्या वर गुंतवणूक केली आहे, संस्थेकडे 28 कोटीच्या वर ठेवी आहेत, तर संस्थेने 18 कोटी इतके कर्जवाटप केले आहे., संस्थेकडे 45 लाखांचे भाग भांडवल आहे. यावर्षी संस्थेला निव्वळ नफा 6 लाख 90 हजार इतका झाला आहे, अशी माहिती दिली. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले. तर नफा तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. सभेला संचालक, संजय मजूकर, भरतकुमार मुरकुटे, सी. एम. उघाडे, किरण गिंडे, भोमाणी छत्र्यान्नावर, मिनाजी नाईक, कल्लप्पा बंडाचे, सौ. अस्मिता पाटील, रवींद्र गिंडे, परशराम गिंडे, चांगदेव हट्टीकर, अनिल पाटील, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, प्रभाकर कणबरकर, रविकांत पाटील, जोतिबा गोरल, वसंत मुचंडी, रवींद्र कणबरकर, जोतिबा पाटील, कांचन पाटील, सोनाली सायनेकर, ज्योती यरमाळकर, संगीता दणकारे, लता गिंडे, वैष्णवी मुरकुटे, यांच्यासह सभासद उपस्थित होते.