Saturday , June 6 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची‌ बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची‌ सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सदर बैठकीत सोमवार दिनांक २२ जून रोजी बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नडसक्ती विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलन संदर्भात विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. तरी या बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, तसेच सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देण्यात येणार्‍या एक लाख सह्यांचे पुस्तक संबंधित कार्यकर्त्यांनी बैठकीला येताना सोबत आणावे आणि ते जमा करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *