Saturday , June 6 2026
Breaking News

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने रोप लावणे आवश्यक

Spread the love

 

नगराध्यक्ष दिगंबर कांबळे; बोरगाव मध्ये पर्यावरण दिन

निपाणी (वार्ता) : वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यातील पिढीला सुरक्षित व निरोगी जीवन देण्यासाठी आजच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत बोरगाव येथील नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.
बोरगाव नगरपंचायत कार्यालय आर.ए. पाटील पब्लिक स्कूल, श्री अरिहंत मराठी व कन्नड माध्यम शाळा या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे संस्कार अंगीकारून समाजात जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन नगराध्यक्ष कांबळे यांनी केले.
आर. ए. पाटील इंग्रजी शाळेकडून प्लास्टिकमुक्त शहर, जलसंवर्धन, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन याबाबत नागरिकांनामार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची तसेच अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणावर आधारित घोषवाक्ये, चित्रप्रदर्शन आणि जनजागृती फेरी काढून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली.
यावेळी उपनगराध्यक्षा रुक्साना अफराज, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, मुख्याधिकारी एस. बी तोडकर, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयिनकर द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे आरोग्यनिरीक्षक महेश नंदीकेश्वर, महसूल निरीक्षक संदीप वाईगडे, समुदाय संघटना अधिकारी एम. बी. ब्रिगिमठ, शाळेचे प्रिन्सिपल श्रीनिवास सर, शाळेचे सी.इ.ओ. बाळासाहेब हावले, यांच्यासह सर्व नगरसेवक, शहरवासीय नगरपंचायत पदाधिकारी शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणगला येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, बहिण गंभीर जखमी

Spread the love  निपाणी : कणगला परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *