बेळगाव : विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय प्राथमिक आंतरशालेय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स मुलींच्या फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी जिल्हा संघावर 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी जिल्हा संघावर4-0 असा एकतर्फी विजय मिळविला. बेळगाव जिल्हा संघातर्फे इफाह अत्तार, मारिया मुजावर तेजल हंसी व जानवी चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्हा संघाचा 3-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले यावेळी विजेत्या बेळगाव जिल्हा संघातर्फे इफाह अत्तार हिने 2 तर मारिया मुजावर हिने 1 गोल केले. विजेत्या बेळगाव जिल्हा संघात अपेक्षा मत्तिकोप, निधी पाटील, दिव्या बेटगेरी, ओमेहांनी पठाण, जान्हवी चव्हाण, निधी नागोजीचे, मृणाल वरपे, अनाह मारीहाळकर, तेजल हंसी, सुदिक्षा मैत्री, मारिया मुजावर, इफाह अत्तार, प्रीती मनकरी, मृदुला मोहिते, अनन्यश्री बल्लारी, दिशा कामत, प्रश्विता देवडीगा, व गौतमी भजंत्री यांचा समावेश आहे. सदर विजेत्या बेळगाव जिल्हा मुलींच्या फुटबॉल संघाला सेंट झेवियर्स स्कूलचे मुख्याध्यापक फादर सिरील बॅग्ज शाळेचे क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारिओ, क्रीडा शिक्षिका ज्युलिएट फर्नांडिस, यांचे प्रोत्साहन तर ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक व सलीम किल्लेदार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.