खानापूर : येत्या २६ सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुका ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला असून या पार्श्वभूमीवर खानापूरमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव येत्या २६ सप्टेंबर रोजी तालुका केंद्रात कामबंद आंदोलन करून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनाला परवानगी देण्यात यावी यासाठी खानापूर तालुका ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावतीने खानापूर उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांच्या मार्फत सरकारच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी खानापूर तालुका ग्राम प्रशासकीय अधिकारी संघाचे अध्यक्ष आर. एस. बागवान, उपाध्यक्ष एम. आर. संगमनावर, प्रधान सचिव सादिक पाश्चापुरे, विनायक वेंगुर्लेकर, करण देसाई, शंकर माळगी आदी उपस्थित होते.