खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि नियंत्रण कमिटी निवड करण्याबाबत सभा आयोजित केली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त समितीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे …
Read More »खानापूरच्या मलप्रभा नदीवरील यडोगा बंधाऱ्याला धोका
खानापूर : गेल्या आठ दहा दिवासापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. मलप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. जांबोटी, कणकुंबी भागात पावसाचा जोर वाढला. तसे मलप्रभा नदीचे पात्र मर्यादेपेक्षा जास्त प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …
Read More »खानापूर- बिडी रस्ता मृत्यूचा सापळा!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर -बिडी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव दुथड्या भरून वाहत आहेत. तालुक्याच्या जंगल भागातील अनेक खेडे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील अनेक गावचे रस्ते खड्डे मय …
Read More »खानापूर शहरातील विद्यानगरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; नगरपंचातीचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात ऐन पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्त्याचा पत्ताच नाही. त्याचबरोबर गटारी नाहीत. ज्या नगरपंचायतीला रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी याची काळजी नाही. अशा नगरपंचातीकडून विकास कधी होणार. मात्र दुसरीकडे नगरपंचायत प्रत्येक घराचा फाळापट्टी, पाणी पट्टी, …
Read More »खानापुर, सौंदत्ती, मुडलगी, यरगट्टी येथील शाळांना उद्या बुधवारी सुट्टी जाहीर
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उद्या बुधवारी (26 जुलै) मुसळधार पावसामुळे खानापूर, मूडलगी, यरगट्टी आणि सौंदती तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आणि फक्त खानापूर तालुक्यातील पीयू महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केवळ खानापूर तालुक्यातील शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर …
Read More »खानापूर तालुक्यात पूल बांधणीसाठी विशेष मोहिम; सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी
खानापूरमध्ये 87 घरांची अंशत: पडझड बेळगाव : पावसाळ्यात खानापुरासह राज्यातील डोंगराळ भागातील शाळकरी मुले व ग्रामस्थांना नदी ओलांडता यावी यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील भुरणकी येथे भेट देऊन घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत …
Read More »प्राथ. शाळा शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; शिक्षकांचे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (सुहास पाटील) : राज्यासह खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांना बीएलओचे काम सरकारने लावले आहे. एकीकडे शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यातच रिक्त असलेल्या शिक्षकांच्या कामाचा भार घेणे, राष्ट्रीय सन, क्रीडा स्पर्धा, प्रतिभा कारंजी स्पर्धा, आधार सिंडींग, ऑनलाईन काम, माध्यान्ह आहार, मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकाना वेळ …
Read More »तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातच आज खानापूर तालुक्यातील तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग लाटगावकर (वय 61) यांचा ख्रिश्चन वाडा गावाजवळील शेतात ट्रॅक्टरने माती काढत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती …
Read More »पास्टोली, गवाळी नागरिकांच्या नशीबी आजही आडीचाच आधार
खानापूर : खानापूर तालुका म्हणजे अतिजंगलाने व्यापलेला तालुका, त्यातच मुसळधार पावसाचा तालुका. त्यामुळे तालुक्याच्या जंगल भागाच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान खुप कष्टाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी सुध्दा खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, गावच्या नागरिकांना अजुनही रस्ता नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यातून येण्यासाठी पुल नाही. पावसाळा आला की या भागातील …
Read More »खानापूर तालुक्यातील अंगणवाडी अर्जदारांची गुरुवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ४९ आणि मदतनिसांच्या ८४ जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta