Tuesday , June 2 2026
Breaking News

मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत यश

Spread the love

 

खानापूर : नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतुर्गा या शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

मुलींमध्ये कुमारी- प्रिया बिर्जे 800 मी. व 1500 मीटर धावणेत प्रथम, कुमारी – कोमल. सांबरेकर 3000 मी. धावणे प्रथम व 1500 मी धावणे द्वितीय, कुमारी मोहिनी गुरव भाला फेक प्रथम व 3000 मी धावणे, तृतीय, कुमारी-विना हेब्बाळकर 200 मी धावणे तृतीय, कुमारी शितल पाटील भाला फेक तृतीय, कुमारी – नेत्रा पाटील 3 कि.मी. चालणे प्रथम, 4×100 मी. रिले द्वितिय मुली कब्बडी मध्ये प्रथम क्रमांक तसेच जोतिबा गोधोळकर 200 मी. धावणे द्वितीय, सोमनाथ लोहार – भालाफेक द्वितीय व कार्तीक बोबाटे भालाफेक तृतीय क्रमांक.

वरील सर्व विद्यार्थ्याना मुख्याधापक जे. एम. पाटील क्रिडा शिक्षक – के आर पाटील व शाळेतील सर्व सहशिक्षकाचे – मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन वाय. एन. मजूकर सर व सचिव प्रसाद मजूकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *