Sunday , July 26 2026
Breaking News

भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता

Spread the love

 

बाकू (अझरबैजान) : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली.

टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी २५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकाणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.

प्रज्ञानानंद याने पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. ३२ वर्षांच्या कार्लसन याने २००४ मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद याचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद याचा जन्म २००५ मधील आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई विषम पातळीवरील असल्याचे दिसतेय. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना रंगतदार झाला, पण अखेर अनुभवाने बाजी मारली.

About Belgaum Varta

Check Also

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, शुभमन गिलचा पत्ता कट

Spread the love  मुंबई : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *