Saturday , June 6 2026
Breaking News

हारूरी येथे विद्युत तारेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; एक जखमी

Spread the love

 

खानापूर : शेतात लावलेल्या विद्युत कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्याने धक्का बसून हारूरी (ता. खानापूर) येथील एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी बेळगावला पाठवले.
हारूरी येथील शेतकरी व शिंदोळी गावचे उपाध्यक्ष यशवंत लकमण्णा शिवटणकर (72) यांचा पिकांना पाणी देताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारांच्या कुंपणाचे विद्युतीकरण करण्यात आले. गावातील एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी वीज जोडली होती. सकाळी यशवंत शिवटणकर हे त्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना विद्युत तारेचा धक्का बसला. त्यावेळी त्यांचे भाऊ पांडुरंग शिवटणकर हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *