खानापूर : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी (दि. 22 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. खानापुर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली …
Read More »दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. क्रे. सोसायटी चेअरमनपदी विलासराव बेळगावकर, व्हा. चेअरमनपदी पुंडलिक नाकाडी
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील तालुक्यात सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोधात पार पडली. यावेळी संचालक पदी शंकर कुडतुरकर (जांबोटी), यशवंत पाटील (ओलमणी), विद्यानंद बनोशी (खानापूर), पुंडलिक गुरव (गोल्याळी), पांडुरंग नाईक (आमटे), पुंडलिक नाकाडी (बैलूर), विलास कृष्णाजी बेळगावकर …
Read More »खानापूर शहरासह तालुक्यात धुवांधार पाऊस, रस्त्याची दयनिय अवस्था
खानापूर : गेल्या चार दिवसापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरालगत रूमेवाडी क्राॅस जवळ रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी आले त्यामुळे रस्ता वाहुन गेला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे …
Read More »हलगा ग्रामपंचायत नुतन अध्यक्षपदी महाबळेश्वर पाटील (मेरडा), उपाध्यक्षपदी मंदा पठाण यांची बिनविरोध निवड
खानापूर : हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत पुढील ३० महिन्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड गुरूवारी दि. २० रोजी पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी महाबळेश्वर परशराम पाटील (मेरडा) यांची तर उपाध्यक्षपदी सौ. मंदा महादेव पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील, रणजित पाटील, प्रविण गावडा, सुनिल …
Read More »खानापूर तालुक्यात संततधार सुरूच; 40 गावांना बेटाचे स्वरूप
खानापूर : मागील दोन दिवसांपासून पश्चिम घाटात धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक गावातील पूल व बंधारे पाण्याखाली आल्यामुळे खानापूर शहराशी कांही गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील जवळपास 40 गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. सतत पडत असणाऱ्या पावसाने हबनहट्टी येथील साधूचे …
Read More »मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन शाळेतूनच; आबासाहेब दळवी
खानापूर : मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे काम शाळांमधून होते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिक्षकानी आपले कर्तव्य समजून मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील सरकारी मराठी मुलांची …
Read More »खानापूर तालुक्यात ५० नवीन मतदान केंद्रे वाढविण्यासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. तसेच विस्तारानेही मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात घनदाट जंगल त्यातच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर खेडी. त्यामुळे जंगलातून चालत जाऊन दुसऱ्या गावच्या मतदान केंद्रावर मतदान करताना मतदारांचे हाल होतात. अनेक वयोवृध्द मतदानापासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार प्रकाश …
Read More »आजपासून खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होऊन बरेच दिवस उलटून गेले. मात्र निवडणूक कधी होणार याकडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. अखेर आज गुरूवार दि. २० पासुन खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीला मुहूर्त मिळाला. खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम …
Read More »हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली
खानापूर : हब्बनहट्टी (जांबोटी ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ओढे-नाले आणि नद्यांचे प्रमाणाबाहेर पाणी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. …
Read More »खानापूर तालुक्यात धुवांधार पाऊस; हालात्री पुलावर पाणी, मणतुर्गा पुल वाहतुकीला बंद
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध भागात धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री पासून हजेरी लावली. त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवर तीन फुट पाणी आल्याने तसेच मणतुर्गा पुलावर पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी रूमेवाडी क्राॅसवर फलक लावून हेम्माडगा मार्ग वाहतुकीला बंद असल्याचे सांगितले आहे. कोणी येथून प्रवास करू नये असे आवाहन केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta