खानापूर : खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात गेली अनेक वर्षे उपतहसीलदार म्हणून कार्य केलेले व सध्या कारवार जिल्ह्यातील जोयडा येथील तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे सोमवार पहाटे अडीचच्या दरम्यान बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल निधन झाले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच आरोग्य बिघडल्याने चव्हाण हे हॉस्पिटलला दाखल झाले होते. राजेंद्र चव्हाण हे एक …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार!
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, राजा शिवछत्रपती स्मारक येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा तसेच खानापूर तालुक्यातुन निमलष्करी दलात दाखल झालेल्या मराठी भाषिक तरूणींचा तसेच कु. सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील …
Read More »नेहरू पी. यू. काॅलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल महाविद्यालय, बिडी, ता. खानापूर येथील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत व कसरत करत उत्तम खेळ केला. यामध्ये कु. सुरेखा गिडप्पणावर, विजयालक्ष्मी गाडेकर, कावेरी मालकी, देमक्का हिंडलकर, सरीता भेकणी, राधिका गिडप्पणावर, तेजस्विनी गौडर …
Read More »तोपिनकट्टी येथे दोन गटात संघर्ष; दोन्हीकडून दगडफेक
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली. रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने मान्यवरांचा 24 रोजी सत्कार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक व निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या खानापूर तालुक्यातील मराठी तरुणींचा तसेच चांद्रयान-३ २०२३ या मोहिमेत यशस्वी झालेल्या इस्रोचे कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. …
Read More »खानापूरातील बकरी बाजारात करोडो रुपयांची उलाढाल
खानापूर : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे उंदरी. गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार नैवद्य दाखविण्याची प्रथा काही भागात आहे. यानिमित्ताने आज रविवारी 17 सप्टेंबर रोजी खानापूरच्या आठवडी बाजारात बकरी बाजार भरला होता. बकरी बाजारात यावर्षी करोडो रुपयांची उलाढाल …
Read More »आयशरची ट्रकला धडक; एक ठार, चार जखमी
खानापूर : नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागून आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) यांचा पाय निकामी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर ट्रकने नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला …
Read More »खानापूर शहर गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर
खानापूर : खानापूर शहर सार्वजनिक गणेशोस्तव महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष श्री. पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर तहसिलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की, या वर्षी पाऊस हा फार कमी झाला त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले …
Read More »आवरोळी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 …
Read More »ढोकेगाळी – हरूरी रस्त्यावर अस्वलाचा दुचाकीस्वारावर हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी – हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकीचा वेग वाढविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे घर गाठले. या घटनेमुळे येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta