Thursday , December 11 2025
Breaking News

निपाणी

श्रीमंत सिद्धोजीराजे सरकार राजवाड्यात श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम

    निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रावण मासानिमित्त अंबाबाई चौकातील श्री. आदिशक्ती व शिवशक्तीचा श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम झाला. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नारळापासून बनवलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी भावी काळात एक परिस्थिती चांगली राहण्यासाठी दीड तास महादेवाचा जप केला. …

Read More »

शनिवारी निपाणीत वीज, पाणीपुरवठा खंडित

  बेनाडी, जत्रांटमध्येही वीज बंद : दिवसभर दुरुस्तीची कामे निपाणी (वार्ता) : हेस्कॉमकडून शनिवारी (ता.९) दिवसभर येथील चिक्कोडी रोडवरील विद्युत केंद्र आणि बेनाडी, जत्राट येथील विद्युत केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या जवाहर तलावावर आणि यमगर्णी जॅकवेल परिसरातही वीज खंडित केली जाणार …

Read More »

निपाणी ते बोरगाव- इचलकरंजी रस्त्याची दयनीय अवस्था!

  निपाणी : निपाणी ते बोरगाव इचलकरंजी नव्याने केलेला रस्ता पहिल्या पावसाळ्यातच वाहून गेल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. ममदापूर बस स्टॅन्डजवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी मधोमध सिमेंटचा बॅरल लावलेला …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निपाणीला धावती भेट

  रस्ता कामांची पाहणी; नागरिकांच्या समस्या तशाच निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांची मदत संपल्याने या पालिकेचा पदभार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आहे. पण या शहराकडे ते बऱ्याच महिन्यापासून आलेले नव्हते. मात्र बुधवारी (ता.६) सायंकाळी शहर आणि उपनगरांना भेट दिली. यावेळी त्यांनी नगरोत्थान योजनेच्या चौथ्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून सुरू …

Read More »

निपाणी हालसिद्धनाथची निवडणूक होणार बिनविरोध

  शेवटच्या दिवशी जोल्ले समर्थकांचे ५ अर्ज; विरोधी गटाकडून एकही अर्ज नाही निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना मानणाऱ्या ५ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ३९ झाली आहे. पण विरोधी …

Read More »

गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीला परवानगी नाही

  मंडल पोलीस निरीक्षक तळवार : गणेशोत्सवाबाबत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव सर्वांना शांततेत साजरा करावयाचा असून सर्व मंडळानी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर किरकोळ आवाजाच्या साधना बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने …

Read More »

निपाणीत शनिवारी ढोल ताशांच्या निनादात लाखाची दहीहंडी

  निपाणी (वार्ता) : तब्बल ३७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चाटे मार्केट व्यापारी दहिहंडी मित्र मंडळच्या वतीने शनिवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता मानाची दहीहंडी फोडली जाणार आहे. विजेत्या गोविंदा पथकास एक लाखांचे बक्षीस व शिल्ड दिली जाणार असल्याचे चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी …

Read More »

बंद घराचे कुलूप तोडून २५ तोळे दागिन्यासह ३ लाख लंपास

  निपाणीत भर दिवसा चोरी; नागरिकांतून भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील चिमगांवकर गल्लीमधील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी रफीक अहमदमजीद पट्टेकरी यांच्या घरात तिजोरी फोडून २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदाजे १६ लाख रूपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

मिरजमध्ये १० पासून शांतिसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

  बाळासाहेब पाटील :९ दिवस विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाच्या शतकातील प्रथमाचार्य १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांचा ६८ वी पुण्यतिथी महोत्सव मिरज येये १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त १० सप्टेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी …

Read More »

निपाणीत शुक्रवारी मोफत तपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.८) सकाळी १० वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर येथील अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …

Read More »