Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

महिला सबलीकरणासाठी ‘गृहलक्ष्मी’ उपयुक्त

  तहसीलदार बळीगार ; निपाणीत गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : महिला सर्वच क्षेत्रात काम करीत असल्या तरी त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानले जात नव्हते. पण अलीकडच्या काळात सरकारने त्यांनाच कुटुंब प्रमुख करून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता दर महिना महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून दोन हजार रुपयाची रक्कम जमा …

Read More »

हेस्कॉमवर मोर्चा काढताच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

  रयत संघटनेचा आक्रमक पवित्रा; तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग ७ तास थ्री फेज तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्ट सर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत …

Read More »

भारतीय सेनेत भरती झालेल्या युवकांचा महादेव मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : शहरातील विविध भागातील युवक आणि युवती भारतीय सेनेत भरती झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर कमिटीतर्फे माजी सभापती सुनील पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जत्राट वेसमधील नंदिनी सोनावणे, मुगळे गल्लीतील ऋषिकेश मेंडगुदले, कुंभार गल्लीतील प्रथमेश पाटील, आमचे गल्लीतील सुरज मलाबादे, …

Read More »

कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे शास्त्रज्ञ चिदानंद मगदूम यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : भारतातील चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी ठरली. या यानाचा विक्रम हा लँडर चंद्रावर उतरताच संपूर्ण भारतीयांनी जल्लोष साजरा केला. या मोहिमेचा भाग असलेले इस्रोचे शास्त्रज्ञ आणि आडी येथील रहिवासी चिदानंद मगदूम यांचा येथील कोल्हापूर वेस व्यापारी मित्र मंडळातर्फे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. …

Read More »

निपाणी तालुक्यात वर्षात २५ आत्महत्या

  युवकांचे प्रमाण लक्षणीय; नैराश्याची भावना कारणीभूत निपाणी (वार्ता) : तारुण्याची अवस्था म्हणजे प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या दिशेने धडपडणारी दमदार पावले समजली जातात, मात्र अलीकडे अनेक युवक शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणांनीनिराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्येसारखे निर्णय घेत आहेत. निपाणी तालुक्यात वर्षभरात २५ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यात …

Read More »

शाळा, विद्यालयांमध्ये फुलणार परसबागा

  शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता निपाणी तालुक्यातील शाळा व विद्यालयांमध्ये परसबागा फुलणार असून विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक होणार आहे. प्रधानमंत्री पोषण …

Read More »

निपाणीत सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : येथील सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार (वय ३३ रा. जत्राटवेस मातंग समाज वसाहत, निपाणी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम …

Read More »

भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा

  राजू पोवार; मंगळवारचा मोर्चा होणारच निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मंगळवारी (ता.२९) आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असताना रयत संघटनेचे बेळगाव जिल्ह्याचे नेते वकील यल्लाप्पा हेगडे यांच्यावर मुर्गेश निराणी आणि त्यांच्या बंधूनी गुंडाच्या माध्यमातून जीवघेणा …

Read More »

‘नेमबाजी’साठी नाईंग्लजच्या उचगावेची निवड

  ब्राझिलमध्ये सप्टेंबरमध्ये रंगणार विश्व नेमबाज स्पर्धा : बेळगाव जिल्ह्यातून एकमेव निवड निपाणी (वार्ता) : मनात जिद्द आणि आत्मविश्वास आणि सहकार्य करणारे हात सोबत असतील तर त्याच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतो. कितीही जबाबदारी आणि काम असले तर त्यातूनही वेळ काढून आपले ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो. याचेच उत्तम …

Read More »

गणरायाला सजविण्यासाठी लगबग

  निपाणी परिसरात मूर्ती कारागिरांची तयारी : उत्सवासाठी अवघा महिना शिल्लक निपाणी (वार्ता) : यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एक महिन्याचा कालावधी उरला असून निपाणी आणि परिसरातील कारागिरांनी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश आहे. सध्या गणेश मूर्ती कारागिरांची गणेशमूर्ती सजविण्यासाठी लगबग सुरू आहे. …

Read More »